ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई पालिकेचे ‘मिशन मोड’; आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

मुंबईत रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. (Iqbal Singh chahal announced mission mode for control to oxygen shortage)

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुंबई पालिकेचे 'मिशन मोड'; आयुक्तांनी दिले 'हे' आदेश
Iqbal singh Chahal
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 7:34 PM

मुंबई: मुंबईत रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने मिशन मोड हाती घेतले आहे. ऑक्सिनज उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील ‘मिशन मोड’ वर कार्यवाही करावी, असे आदेशच महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. (Iqbal Singh chahal announced mission mode for control to oxygen shortage)

ऑक्सिजन नसल्यामुळे मुंबई पालिकेच्या 6 रुग्णालयातील 168 रुग्णांना शनिवार, 17 एप्रिल रोजी ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या महानगरपालिका रुग्णालये आणि समर्पित कोरोना आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात कार्यप्रणालीमध्ये अधिक सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध सह आयुक्त, उपआयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते.

आयुक्तांचे आदेश

कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज सर्वत्र निर्माण झाली असून मुंबई त्याला अपवाद नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनासह ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार यांच्यावर असलेला ताण समजण्यासारखा आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मुंबईसाठी सध्या प्रतिदिन देण्यात येत असलेला 235 मॅट्रिक टन ऑक्सिजन साठा कमी करण्यात येऊ नये. ऑक्सिजन उत्पादन स्थळापासून त्याची वाहतूक आणि मुंबईतील सर्व कोरोना रुग्णालये व कोरोना केंद्र तसेच इतर रुग्णालयांमध्ये देखील त्याचे वितरण होईपर्यंतच्या सर्व बाबींवर देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेची पथके नेमण्यात येतील. ही पथके रुग्णालयांना दररोज प्राप्त झालेला ऑक्सिजन साठा किती त्याची माहिती गुगल ड्राईव्हमध्ये अद्ययावत करतील. त्यामुळे दररोज मागणीच्या तुलनेत किती ऑक्सिजन मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतो, त्यावर देखरेख करता येईल, अशा सूचना चहल यांनी दिल्या. तसेच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी सर्वांनी मिशन मोडवरच काम करावं, असे आदेशही त्यांनी दिले. त्यावर सहमती दर्शवत अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांनी या कामी महानगरपालिकेच्या यंत्रणेला अन्न व औषध प्रशासनाकडून देखील आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असं स्पष्ट केलं.

500 टन ऑक्सिजन मिळणार

यावेळी चहल यांनी ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. मुंबईतील सर्व रुग्णालयांना विशेषतः खासगी रुग्णालयांना उपलब्ध ऑक्सिजन साठ्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विशाखापट्टणम, जामनगर आणि रायगड या तिन्ही ठिकाणांहून मिळून सुमारे 500 टन अधिकचा प्राणवायू साठा लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा असून त्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्या

दरम्यान, ऑक्सिजनचा साठा मिळेपर्यंत तोपर्यंत यंत्रणेसह प्राणवायू उत्पादक आणि पुरवठादार यांनी देखील मिशन मोडवर काम करावे, महानगरपालिकेने नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यासोबत मिळून सर्व विभागातील रुग्णालयांना वेळेवर प्राणवायू साठा पुरवावा. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणताही अनुचित प्रसंग ओढवणार नाही, याची दक्षता घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे आदेशही त्यांनी दिले. (Iqbal Singh chahal announced mission mode for control to oxygen shortage)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

Maharashtra Lockdown : किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार! गर्दी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोना संसर्ग, दिल्लीतील एम्समध्ये दाखल

(Iqbal Singh chahal announced mission mode for control to oxygen shortage)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.