AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना?; ममता बॅनर्जी-शिवसेना भेटीवरून शेलारांचा हल्लाबोल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना?; ममता बॅनर्जी-शिवसेना भेटीवरून शेलारांचा हल्लाबोल
Ashish Shelar
Reporter Rahul Zori
Reporter Rahul Zori | Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 7:05 PM
Share

मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आणि ममतादीदींच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे. हे एक कटकारस्‍थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्‍ये घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले. ममता बॅनर्जी यांची आदित्‍य ठाकरे यांनी काल भेट घेतली. मुख्‍यमंत्र्यांच्‍यावतीने ही भेट आपण घेतल्‍याचे आदित्‍य ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या गुप्त बैठकीमध्‍ये कटकारस्‍थान तर नाही ना शिजलं? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

भेट कशासाठी होती?

ममतादीदींचे महाराष्‍ट्रात सरकारी पक्षांनी स्‍वागत केले. ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे. पण त्‍यानंतर मंत्री आदित्‍य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्‍यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्‍ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्‍नेह असल्‍याचे सांगून या भेटी घेतल्‍या जातात. तुमचा कौटुंबिक स्‍नेह असेलही. आम्‍हाला त्‍याबद्दल काय करायचे आहे? पण महाराष्‍ट्राचा त्‍याच्‍याशी काय सबंध? बांग्‍लादेशीयांना संरक्षण देणाऱ्या ममतादिदी यांच्‍याशी कुठले आले कौटुंबिक संबध? असा सवालही त्‍यांनी केला.

तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार का?

ममतादिदी महाराष्‍ट्रातील उद्योगांना आपल्‍या राज्‍यात यायचे आमंत्रण देण्‍यासाठी आल्‍या आहेत. देशभर सर्वत्र उद्योग धंदे असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे. मात्र आपल्‍या राज्‍यातील उद्योग तुम्‍ही घेऊन जा, असे महाराष्‍ट्रातील सत्‍ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्‍न आहे. महाराष्‍ट्रातील रोजगार, व्‍यवसाय, इंडस्‍ट्रीज इथून घेऊन जाण्‍यास सत्‍ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय? महाराष्‍ट्रात कँग्रेसला ना स्‍थान, ना इज्‍जत, ना किंमत, ना स्थिती त्‍यामुळे काँग्रेसला काय ते त्‍यांचे त्‍यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्‍ट्राचा आहे. महाराष्‍ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्‍ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

ममता दिदींना हिंदू राष्ट्र मान्य आहे का?

आम्‍हाला जय हिंदू राष्‍ट्र हे मान्‍य आहे, ते ममतादिदींना मान्‍य आहे का? ते मान्‍य नसेल तर ते शिवसेनेला मान्‍य आहे का? असा सवाल त्यांनी केला. हिंसेच्‍या घटनांनी पश्चिम बंगालमधील जनता त्रस्‍त आहे. आता हे दोघे मिळून बंगाल आणि महाराष्‍ट्र अस्थिर करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. तुमच्‍याकडे आलेल्‍या टाटांना तुम्‍ही अपमानीत करून पाठवलेत. उद्योग जगतात ज्‍यांचे आदराने नाव घेतले जाते त्‍या मुंबईकर टाटांचा ज्‍यांनी अपमान केला त्‍यांना शिवसेना महाराष्‍ट्रात पायघड्या घालते? आणि आम्‍हाला मग महाराष्‍ट्र धर्म तुम्‍ही शिकवता? असा सवालही त्‍यांनी केला. म्‍हणून या बैठकीमागे कटकारस्‍थान आहे. ते हिंसाचाराचे आहे, रोजगार पळवण्‍याचे आहे, कारखाने पळवण्‍याचे आहे. दहशत पसरवण्‍याचे आहे का? असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

VIDEO: ममता बॅनर्जी पवारांसमोरच म्हणाल्या, यूपीए आहे कुठे?; ममतादीदींनी काँग्रेस नेतृत्व नाकारलं?

महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसं उत्तर देणार, उर्जामंत्री नितीन राऊतांना राजू शेट्टींचं उत्तर

परदेशात राहून राजकारण कसं होईल?; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...