AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे सर्व निर्णय पवार कुटुंबातच होतात का? जयंत पाटील यांच्याकडून मोठा खुलासा

"भाजपसोबत सत्तेत जायचं हा निर्णय राष्ट्रवादीमध्ये झालेलाच नाही. तो निर्णय अजितदादांनी घेतला. त्यावेळी मला माहिती नव्हतं की सुप्रिया सुळे तिथे गेल्या. मी त्यांना नंतर विचारलंही नाही की तुम्ही तिकडे का गेलात म्हणून?", असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे सर्व निर्णय पवार कुटुंबातच होतात का? जयंत पाटील यांच्याकडून मोठा खुलासा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 01, 2024 | 4:08 PM
Share

मुंबई | 1 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेच्या महासंग्राम’ कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याबाबत खुलासा केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठकीसाठी गेल्या होत्या. पण काही वेळाने त्या बंगल्याबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी नेमक्या काय घडामोडी घडल्या होत्या, याबाबत जयंत पाटील यांनी खुलासा केला. विशेष म्हणजे अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवारांनी राजीनामा दिला याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना माहिती असल्याची चर्चा होती. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादीचे सर्व निर्णय पवार कुटुंबातच होतात का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

“भाजपसोबत सत्तेत जायचं हा निर्णय राष्ट्रवादीमध्ये झालेलाच नाही. तो निर्णय अजितदादांनी घेतला. त्यावेळी मला माहिती नव्हतं की सुप्रिया सुळे तिथे गेल्या. मी त्यांना नंतर विचारलंही नाही की तुम्ही तिकडे का गेलात म्हणून?”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. “अजित पवार गटाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा मला माहिती नव्हतं. त्यादिवशी त्यांनी सर्व आमदारांना बोलवून बैठक बोलावली होती. त्यावेळी बऱ्याच आमदारांचा मला फोन आला. आम्ही तिकडे जातोय जाऊ का? मी म्हटलं त्यांनी बोलावलं आहे तर जा. जायला काहीच हरकत नाही. मी माझ्या घरी आहे. तुमचं तिकडचं काम झाल्यावर माझ्याकडे या. काही आमदार मंत्री झाले त्यांनीही फोन केले. मी सर्वांना जा सांगितलं”, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

“शरद पवार यांच्या राजीनाम्याचा निर्णय स्वत:चा निर्णय आहे. त्यांनी त्याबाबत कुणाला सांगितलं नाही. बाकी सर्व निर्णय व्हायचे त्यावेळी सर्वांना विचारुन निर्णय घ्यायची शरद पवारांची प्रथा आहे. विषयाशी संबंधित कुणी कार्यकर्ते आले त्यांना विचारुन निर्णय घ्यायचे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

शरद पवारांनी थांबायला पाहिजे का?

“अजित दादा काय म्हणले कुठेतरी थांबायला पाहिजे. पण कुठे थांबायचं ते हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. आता 84 व्या वर्षी त्यांना काम करायची अजून इर्ष्या असेल तर त्यांनी थांबावं की न थांबावं हा त्यांचा चॉईस आहे. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अजित पावारांना वाटतं की, राजकारणात कुणीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा चॉईस आहे. मी कुठे थांबवायचं ते मी ठरवेल. दुसऱ्याबद्दल मी कसं बोलवेल? या वयात त्यांच्यासारख्या प्रचंड अनुभव असणाऱ्या आणि ज्यांची बुद्धी पूर्ण शाबूत आहे, पूर्ण कार्यक्षमतेने काम करु शकते, त्या व्यक्तीला त्यांनी आयुष्यभर तेच काम केलं आहे. त्यात काम करणं म्हणजेच त्यांच्या आयुष्याची वाढ होणं आणि त्यातच त्यांचं मन रमणं ते काम त्यांना थांबावायला सांगणं हे योग्य नाही”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

“शरद पवार यांच्यात आजही प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती, काम करायची ताकद आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला सगळ्या गोष्टींचा त्यांना अभ्यास आहे. मला वाटतं अशी व्यक्ती भारतातील कोणत्या राज्यात एवढी जास्त अनुभवी, संसदीय कार्यपद्धतीचा आदर करणारी, साधनसुचिता सांभाळून राजकारणात काम करणारी अशी व्यक्ती राजकारणात असेल असं मला वाटत नाही. विरोधकांचा आदर करणे, एखाद्याशी संवाद कितीही प्रचंड विरोध असला तरी समोर आल्यावर संवाद करणे”, असं जयंत पाटील म्हणाले.

Follow Us
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश