AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बालवीर’ मालिकेतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या घरात चोरी, दोन लाखांचे दागिने लांबवले

बालवीर मालिकेतील ‘ज्वाला परी’ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्री खुशबू मुखर्जीच्या घरात चोरी झाली आहे. चोरीत जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले आहेत. (Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee's house)

'बालवीर' मालिकेतील आघाडीच्या अभिनेत्रीच्या घरात चोरी, दोन लाखांचे दागिने लांबवले
| Updated on: Oct 17, 2020 | 8:50 AM
Share

मुंबई : बालवीर मालिकेत ‘ज्वाला परी’ची भूमिका निभावणारी आघाडीची अभिनेत्री खुशबू मुखर्जीच्या (खुशी मुखर्जी) घरात चोरी झाली आहे. शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रात्री हा चोरीचा प्रकार घडला असून, चोरीत जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरले आहेत. खुशबू मुखर्जी मालाड पश्चिमच्या जनकल्याण नगरमधील मरीना प्लाझा इमारतीत राहते. याच इमारतीतील तिच्या 301 नंबरच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी (16 ऑक्टोबर) रात्री  हा प्रकार घडला. (Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee’s house)

मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू मुखर्जी ही मालाड पश्चिमच्या प्लाझा इमारतीत राहते. तिथे तिचा फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री तिने फोटोशुटचे आयोजन केले होते. यावेळी फोटोशूसाठी बाहेरुन तीन जण आले होते. त्यानंतर फोटोशुट झाल्यानंतर अभिनेत्री खुशबूच्या घरातील जवळपास 2 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. खुशबू मुखर्जीला हे कळताच तिने पोलिसात धाव घेतली. खुशबूने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भादविच्या कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अभिनेत्री खुशबू मुखर्जी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. बालवीर मालिकेत तिने ज्वाला परीची भूमिका केलेली आहे. तिच्या या भूमिकेमुळे घराघरात तिचे चाहते आहेत. रहस्यमय पद्धतीने झालेल्या या चोरीनंतर सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, चोरी फोटोशुटसाठी आलेल्या तिघांनी केली ? की तिच्या घरच्यांनीच कुणीतरी दागिने पळवले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. तर दुसरीकडे मालवणी पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली असून, लवकरच आरोपीला बेड्या ठोकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक

सावधान! तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले

चोराचं धाडस बघा ! चक्क कोरोना रुग्णालयात जाऊन करायचा चोरी; पोलीसही अवाक

(Jewelery of worth 2 lakh stolen from actress Khushboo Mukherjee’s house)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.