जोगेंद्र कवाडे अखेर शिंदे गट, भाजपच्या महायुतीत सामिल; कवाडे यांना किती जागा हव्यात? आकडा समोर

| Updated on: Jan 04, 2023 | 2:18 PM

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे.

जोगेंद्र कवाडे अखेर शिंदे गट, भाजपच्या महायुतीत सामिल; कवाडे यांना किती जागा हव्यात? आकडा समोर
जोगेंद्र कवाडे अखेर शिंदे गट, भाजपच्या महायुतीत सामिल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पिपल्स रिपब्लिकन पार्टीची युती झाली आहे. तसंच पत्रकच जोगेंद्र कवाडे यांनी काढलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीत पीआरपीचाही समावेश झाला आहे. या महायुतीचा राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो आणि या महायुतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी एक पत्रक काढलं आहे. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आमची युती होत आहे. याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत करण्यात येणार असल्याचं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शिव, शाहू, फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सम्यक परिवर्तनाचा विचार हा आमच्या आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासगामी करण्यासाठी व राज्यातील सर्व समाज समूहांच्या हक्कासाठी शिंदे आणि त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे. थोर महामानवांच्या विचारावर आमची आघाडी वाटचाल करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या युतीच्या माध्यमातून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणार असल्याचं सांगतानाच आम्ही शिंदे यांच्याकडे 41 जागा मागितल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. कवाडे यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच कवाडे हे या युतीला तयार झाल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आंबेडकर आणि सुभाष देसाई यांची युतीला मूर्तरुप देण्यासाठीची चर्चाही सुरू आहे.

मात्र, या युतीला महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष विरोध करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. असं असलं तरी शिवसेनेही आंबेडकर यांच्यासोबत युती करण्याची उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे या युतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.