Dhananjay Munde Accident | डोक्याला गमजा, अंगाभोवती शाल, अपघातात जखमी धनंजय मुंडे मुंबईला रवाना

सकाळी 10 वाजेच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांचंच ट्विट आलं. त्यांनी काल झालेल्या अपघाताची माहिती दिली.

Dhananjay Munde Accident | डोक्याला गमजा, अंगाभोवती शाल, अपघातात जखमी धनंजय मुंडे मुंबईला रवाना
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 1:25 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, बीडः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे परळीतून लातूर आणि त्यानंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत. काल परळीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. अपघातात (Accident) त्यांच्या छातीला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आलंय.

धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्रीच अपघात झाला. मात्र सकाळपर्यंत याची फारशी माहिती बाहेर आलेली नव्हती.

हे सुद्धा वाचा

Dhananjay Munde Accident

सकाळी 10 वाजेच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांचंच ट्विट आलं. त्यांनी काल झालेल्या अपघाताची माहिती दिली.

परळीत रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. अपघातात किरकोळ दुखापत झाली असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं होतं.

धनंजय मुंडे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे म्हटले जात असले तरीही या अपघातातून लवकर सावरण्यासाठी त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला रवाना करण्यात आलं.

परळीतून लातूर आणि लातूरमधून त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परळीत त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती. पण लातूरकडे रवाना होईपर्यंत मुंडे यांना कुणाचीही भेट घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

अखेर दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. यावेळी त्यांच्या डोक्याला पांढऱ्या रंगाचा गमजा गुंडाळलेला होता. तर अंगाभोवती करड्या रंगाची शाल गुंडाळलेली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.