मुंबईत जैन समुदायाचं आंदोलन, सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाचा वाद पेटला

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 04, 2023 | 12:52 PM

सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी विश्व जैन संघटनेच्या नेतृत्वात दिल्लीत रविवारी मोर्चा काढण्यात आला, आज मुंबईतही जैन महासंघ आक्रमक झाला.

मुंबईत जैन समुदायाचं आंदोलन, सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाचा वाद पेटला
Image Credit source: ANI

मुंबईः झारखंडमधील सम्मेद शिखरजी (Sammed Shikharji) तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन समाजाने आज मुंबईत आंदोलन केलं. गुजरातमधील पलिताणा येथील जैन (Jain) मंदिरात तोडफोडीनेही जैन समाज आक्रमक झाला आहे. आज मुंबईत आझाद मैदानावर (Azad Ground) जैन समाजाने मोठं आंदोलन छेडलं.

आज सकाळपासूनच जैन समाजाने मुंबईत निदर्शनाला सुरुवात केली. आझाद मैदान परिसरातील रस्ते ब्लॉक करण्यात आले. आमच्या तीर्थक्षेत्राला मुक्त करावे, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्याने जैन समाज रस्त्यावर उतरला.

15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने झारखंडमधील सर्वात महत्त्वाच्या जैन समाजाच्या तीर्थक्षेत्राविषयीचा हा निर्णय घेतला. तेव्हापासूनच देशभरात लहान लहान आंदोलनांना सुरुवात झाली. मात्र सरकार या मागण्यांना दाद देत नाहीये, हे पाहून आता जैन महासंघाने रस्त्यावर उतरून लक्षवेधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

आज सकाळपासूनच जैन समाजाने मुंबईत निदर्शनाला सुरुवात केली. आझाद मैदान परिसरातील रस्ते ब्लॉक करण्यात आले. आमच्या तीर्थक्षेत्राला मुक्त करावे, अशी मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्याने जैन समाज रस्त्यावर उतरला.

केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध

झारखंडमधील पारसनाथ सम्मेद शिखरजी या जैन समाजाच्या तीर्थक्षेत्राला केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही सदर योजनेची सविस्तर माहिती नाही.

केंद्र सरकारने पारसनाथ पर्वताला इको सेन्सिटिव्ह झोन घोषित केल्याने हा वाद सुरु आहे, त्यामुळे तेदेखील यावर फार प्रतिक्रिया देत नाहीयेत.

याविरोधात देशभरातील जैन संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित केल्यानंतर येथील पावित्र्य धोक्यात येईल. तीर्थक्षेत्राचं बाजारीकरण होईल, असं मत जैन संघटनांचं आहे.

सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी विश्व जैन संघटनेच्या नेतृत्वात दिल्लीत रविवारी मोर्चा काढण्यात आला. रविवारी इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चेकरी गेले. राष्ट्रपतींची भेट घेऊन आंदोलक आपल्या मागण्या मांडणार होते.

मात्र पोलिसांनी त्यांना मार्गातच अडवले. विश्व जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय जैन आणि राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडीच्या रुची जैन या सहा दिवसांपासून उपोषणाला बसल्या होत्या.

भाजप खासदार मनोज तिवारी यांनी उपोषण स्थळावर जाऊन त्यांना चर्चेचं आश्वासन दिलं. त्यानंतर 15 दिवसांसाठी हे उपोषण स्थगित करण्यात आलंय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI