AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योती मेटे फडणवीसांच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट

विरोधकांनी पत्ते उघडल्यानंतर आता भाजप आपली पत्ते उघडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता तोंडावर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 27 मार्चपर्यंत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महायुतीत असलेल्या छोट्या पक्षांना महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले जात होते. असं असताना आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

ज्योती मेटे फडणवीसांच्या भेटीला, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट
ज्योती मेटे फडणवीसांच्या भेटीला
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 24, 2024 | 8:54 PM
Share

विरोधकांनी पत्ते उघडल्यानंतर आता भाजप आपली पत्ते उघडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता तोंडावर आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 27 मार्चपर्यंत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महायुतीत असलेल्या छोट्या पक्षांना महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न केले जात होते. विशेष म्हणजे रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी शरद पवार यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली होती. ते महाविकास आघाडीकडून लढवतील, अशी चर्चा होती. तर शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी यांनीसुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती. त्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत होती. असं असताना आज भाजपने वेगळीच खेळी खेळली आहे. महादेव जानकर यांना महायुतीकडून एक जागा देण्यात आल्याची घोषणा करण्यात आलीय. तसेच ज्योती मेटे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस गेल्या काही तासांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकांमध्ये व्यस्त आहेत. पण आता त्यांच्या सागर बंगल्यावर ज्योती मेटे आल्याने फडणवीस देखील त्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. ज्योती मेटे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश होईल, अशी चर्चा होती. पण त्यानंतर आता ज्योती मेटे फडणीसांच्या भेटीसाठी आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्योती मेटे भाजपकडून लढणार?

ज्योती मेटे या बीडमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्या शरद पवार गटात प्रवेश करुन बीडमधून निवडणूक लढणार अशी माहिती समोर येत होती. पण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांना पक्षाकडून उमेदवारीदेखील मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता ज्योती मेटे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप ज्योती मेटे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देणार की दुसरं काही आश्वासन ज्योती मेटे यांना दिलं जातं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामचे कार्यकर्ते आपण लोकसभा निवडणूक लढावी, यासाठी आग्रही असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ज्योती मेटे यांना भाजपकडून उमेदवारी मिळते का, किंवा ज्योती मेटे या बीडमध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतात का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

महादेव जानकर महायुतीतच राहणार

ज्योती मेटे या फडणवीसांच्या भेटीला जाण्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची आज वर्षा बंगल्यावर बैठक सुरु असतानाच महादेव जानकर तिथे दाखल झाले. यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला लोकसभेची एक जागा सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे महादेव जानकर यांनी आपण महायुतीच राहू, असं आश्वासन दिलं. महादेव जानकर यांचा हा निर्णय महाविकास आघाडी आणि शरद पवार गटासाठी धक्का आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!