VIDEO : उड्डाण पुलावर गळफास घेण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून थरारक सुटका

ठाण्यातील कळवा इथे एका 40 वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्येचा (Kalwa bridge suicide attempt) प्रयत्न केला.

VIDEO : उड्डाण पुलावर गळफास घेण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून थरारक सुटका

ठाणे : ठाण्यातील कळवा इथे एका 40 वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर गळफास घेऊन आत्महत्येचा (Kalwa bridge suicide attempt) प्रयत्न केला. मात्र ठाणे वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत, जवळच असलेल्या हायड्राने त्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले. (Kalwa bridge suicide attempt)

भगवान कांबळे असं या व्यक्तीचं नाव आहे. नुकतंच त्यांच्या मुलाचे निधन झाले असून, त्याचा मानसिक धक्का तसेच, कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान यांनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कळवा नाका उड्डाण पुलावर भगवान कांबळे गेले आणि त्यांनी सोबत आणलेला दोरखंड उड्डाणपुलावरील रेलिंगला बांधून, गळफास घेतला. मात्र हा सर्व प्रकार खाली उभे असलेले नागरिक पाहत होते.

नागरिकांनी पोलिसांना सांगून हायड्रा लावून भगवान कांबळे यांना सुखरुप खाली उरवले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. भगवान यांनी हे कृत्य करताना मद्यप्राशन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आलं आहे.

Published On - 12:44 pm, Tue, 3 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI