‘तुका म्हणे पवारा…’ या फेसबुक पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा नव्या वादात, अखेर गुन्हाही दाखल

'तुका म्हणे पवारा...' या फेसबुक पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा नव्या वादात, अखेर गुन्हाही दाखल

केतकीने ही कविता आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केल्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. शरद पवार समर्थकांनी तिला ट्रोल करत तिला अनेकांनी सवालही उपस्थित केले आहेत.

हिरा ढाकणे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 6:00 AM

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki chitale) आणि वाद हे समीकरण नवं नाही. केतकी चितळेने नुकतीच ‘तुका म्हणे पवारा…’ ही कविता फेसबुकला पोस्ट (Facebook Post) केली आणि ती ट्रोलसुद्धा झाली आहे. याआधीही केतकी चितळेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. यावेळीही तिने जी कविता शेअर केली आहे, त्या कवितेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जवाहर राठोड यांची `डोंगराचे ढोल` या संग्रहातील `पाथरवट` ही कविता लोकांसमोर सादर केली होती. त्याचा संदर्भ केतकीच्या पोस्टला आहे. केतकी चितळेच्या आधीही भारतीय जनता पक्षाने त्यावरून नवाच वाद निर्माण केला होता. त्यामुळे जवाहर राठोड यांची ती जुनी कविता पुन्हा एकदा चर्चेत आली. त्या कवितेचा संदर्भ देत शरद पवार यांच्यावर अनेकांनी सोशल मीडियावर टीका केली.


ही पोस्ट कशासाठी

केतकी चितळे हिने आज पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट करत ती चर्चेत आली आहे. केतकी चितळे म्हणजे नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री. गेल्या काही दिवसांपासून तिने वादग्रस्त पोस्ट केली नव्हती मात्र त्याआधी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. आजही तिने ‘तुका म्हणे पवारा…’ ही दुसऱ्याची कविता आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केल्याने तिला ट्रोल करण्यात आली आहे. मात्र केतकीने आजच ही पोस्ट का केली आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे. साताऱ्यातील कार्यक्रमानंतर शरद पवारानी पाथरवट ही कविता लोकांसमोर आणल्यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाना साधला होता. त्यानंतर काही कालावधितच केतकी चितळेनी ही कविता पोस्ट शेअर केल्याने ती ट्रोल झाली आहे.

भाजपकडूनही जोरदार पवारांवर जोरदार टीका

साताऱ्यामध्ये परवा शरद पवारांनी जवाहर राठोड यांची `डोंगराचे ढोल` या संग्रहातील `पाथरवट` ही कविता लोकांसमोर आणल्यानंतर त्यावर अनेकांनी सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा केल्या गेल्या. ती कविता सादर केल्यानंतर भाजपने ट्विट करत त्या कवितेचा संदर्भ त्यांनी धर्माशी जोडून शरद पवारांवर जोरदार टीका केली. तर आज अभिनेत्री केतकी चितळेने ‘तुका म्हणे पवारा…’ ही कविता फेसबुकला शेअर केली असल्याने त्यावरुन ती ट्रोल झाली आहे.

पाथरवट कवितेला प्रतिक्रिया आहे का

केतकीने ही कविता आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केल्यामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. शरद पवार समर्थकांनी तिला ट्रोल करत तिला अनेकांनी सवालही उपस्थित केले आहेत. शरद पवारांनी ज्या पाथरवट कवितेत एका समाजाचे दुःख काय आहे, त्यांना कोणत्या वेदना होतात हे सांगितले होते, मात्र केतकी चितळेंनी शेअर केलेली कविता ही पाथरवट कवितेला प्रतिक्रिया आहे का असा सवालही अनेकांनी केला आहे.

केतकी यापूर्वी वादात

याआधीही केतकी चितळेने केलेल्या पोस्टमुळे वादात सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते. त्यानंतर तिने आक्षेपार्ह विधान केले म्हणून तिच्यावर अॅट्रोसिटी टाकण्याची मागणीही करण्यात आली होती. त्याआधीही केतकी चितळेने शेजाऱ्यांबरोबर रंगपंचमीदिवशी आवाजाच्या कारणावरुन वाद करुन ती त्यावेळी चर्चेत आली होती.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें