AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता चंद्रावर होणार शेती, पहिल्यांदाच चंद्रावरच्या मातीत उगवली रोपं, अमेरिकन वैज्ञानिकांची कमाल

नासाच्या अपोलो मोहिमेत ६ अंतराळ यात्रींनी ३८२ किलोग्रॅमचा दगड चंद्रावरुन पृथ्वीवर आणला होता. या दगड वैज्ञानिकांत वाटण्यात आला. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या प्राध्यपकांनी सांगितले की ११ वर्षांत ३ वेळा अर्ज केल्यानंतर, नासाने त्यांना १२ ग्रॅम चंद्रावरील माती दिली होती. एवढ्याच्या मातीत हे सर्व करणे फार अवघड होते.

आता चंद्रावर होणार शेती, पहिल्यांदाच चंद्रावरच्या मातीत उगवली रोपं, अमेरिकन वैज्ञानिकांची कमाल
moon sand plant
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 10:33 PM
Share

वॉशिंग्टन चंद्रावर मानवाची वस्ती व्हावी, यासाठी वैज्ञानिक अनेक प्रकारचे संशोधन करीत आहेत. याच प्रयत्नांच्या साखळीत अमेरिकेतील फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या (University of Florida )वैज्ञानिकांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी चंद्राच्या मातीत (sand on moon)रोपं उगवण्यात यश मिळवलं आहे. काही काळापूर्वी नासाच्या (NASA)अपोलो मिशनच्या अंतराळवीरांनी ही चंद्रावरील माती पृथ्वीवर आणली होती. केवळ पृथ्वीवरील मातीतच नव्हे तर अंतराळातून आलेल्या मातीतही रोपं उगवू शकतात, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. कम्युनिकेशन बायोलॉजी जर्नल मध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. या अभ्यासात वैज्ञानिकांनी चंद्रावरील मातीवर (लूनर रिगोलिथ) रोपांच्या जैवप्रकियेची तपासणी केली. चंद्रावर शेती, ऑक्सिजन निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा.

अशी उगवण्यात आली चंद्रावरील मातीतून रोपं

या प्रयोगापूर्वीही चंद्रावरील मातीतून रोपं उगवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळी या रोपांवर केवळ ती माती शिंपडण्यात आली होती. यावेळी मात्र पूर्ण चंद्रावरील मातीतच रोपे उगवण्यात आली आहेत. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एनालिसा पॉल यांनी ही माहिती दिली आहे.

संशोधकांनी रोपं उगवण्यासाठी ४ प्लेट्सचा उपयोग केला होता. यात पाण्यात असे काही न्यूट्रिएंट्स मिसळण्यात आले, जे चंद्रावरील मातीत सापडत नाहीत. त्यानंतर या मिश्रणात आर्बिडोप्सिसच्या बिया टाकण्यात आल्या. काही दिवसांनी या बियांमधून छोटी रोपे बाहेर आली आहेत.

चंद्रावरील केवळ १२ ग्रॅम मातीचा झाला वापर

नासाच्या अपोलो मोहिमेत ६ अंतराळ यात्रींनी ३८२ किलोग्रॅमचा दगड चंद्रावरुन पृथ्वीवर आणला होता. या दगड वैज्ञानिकांत वाटण्यात आला. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीच्या प्राध्यपकांनी सांगितले की ११ वर्षांत ३ वेळा अर्ज केल्यानंतर, नासाने त्यांना १२ ग्रॅम चंद्रावरील माती दिली होती. एवढ्याच्या मातीत हे सर्व करणे फार अवघड होते. मात्र अखेरीस एवढ्या कष्टांनंतर रोपं उगवण्यात त्यांना यश आलं आहे. ही माती अपोलो ११, १२ आणि १७ या मोहिमेत जमा करण्यात आली होती. आता या प्रयत्नांमुळे चंद्रावर शेती करणे शक्य होईल असा निष्कर्ष काढता येणे शक्य होणार आहे. आगामी काळात चंद्नावर मानवी वस्तीसाठीचा हा अत्यंत महत्त्वाचा शोध मानावा लागेल. 

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.