रक्तबंबाळ सोमय्या गाडीतच बसून राहिले! बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते, खारमधील संपूर्ण घटनाक्रम इथे वाचा

Kirit Somaiya : जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला. रक्तबंबाळ हनुवटीसह सोमय्या गाडीतच बसून राहिले होते.

रक्तबंबाळ सोमय्या गाडीतच बसून राहिले! बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते, खारमधील संपूर्ण घटनाक्रम इथे वाचा
किरीट सोमय्या आणि मोहित कंबोजImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 9:10 AM

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत पेटलाय. शुक्रवारी मातोश्री (b) बाहेर तर शनिवारी खारमध्ये राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला. आता थेट भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटलाय. राजकीय घडामोडींना वेग आलाय. या संपूर्ण घडामोडींमध्ये सोमय्या पुन्हा जखमी झालेत. त्यांच्यागाडीवर दगडफेक कऱण्यात आली. जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला. रक्तबंबाळ हनुवटीसह सोमय्या गाडीतच बसून राहिले होते. ते बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हते. अशी स्थिती होण्याआधी नेमक्या घडामोडी काय घडल्या… ते सोप्या शब्दांत समजून घेऊ…

शुक्रवार, 22 एप्रिल –

  1. नवनीत राणा आणि रवी राणा मुंबईत आले
  2. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा त्यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले
  3. दुपारी रवी राणा आणि नवनीत राणांची पत्रकार परिषद झाली
  4. दोघांनी आपण मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं..
  5. रात्री मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा खडा पाहारा होता
  6. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला
  7. मोहित कंबोज यांची गाडी कलानगर सिग्नलवर असताना हा हल्ला झाला
  8. रेकी करण्याच्या उद्देशानं मोहित कंबोज आले असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केली
  9. रात्रभर मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी पाहारा दिला, तर दुसरीकडे खारमध्ये राणा दाम्पत्याच्या घराबाहेरही शिवसैनिक रात्रभर तळ ठोकून होते

शनिवार, 23 एप्रिल

  1. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसैनिकांनी खारमध्ये गर्दी
  2. खारमध्ये पोलिस बंदोबस्त पोलिसांनी वाढवा, तर राणा दाम्पत्याला नजरकैदेत ठेवलं
  3. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीजवळ जाण्यावार ठाम होतं
  4. ‘बाहेर या तुम्हाला महाप्रसाद देतो’ असा इशारा शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिला होता
  5. त्यानंतर काही शिवसैनिक पोलिसांचं बॅरिकेटींग तोडून राणांच्या इमारतीत घुसले
  6. खारमधील राणांच्या निवासस्थानाबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या
  7. शिवसेनेनं हनुमान चालीसेला हनुमान स्तोत्रानं प्रत्युत्तर दिलं
  8. अखेर दुपारी तीन वाजता राणा दाम्पत्यानं माघार घेत मातोश्रीवर जात नसल्याचं म्हटलं
  9. पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यामुळे माघात घेत असल्याचं राणा दाम्पत्यानं स्पष्ट केलं
  10. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं, त्यांना अटक केली आणि खार पोलिस स्थानकात आणलं
  11. खारमध्ये राणा दाम्पत्यानं पोलिस तक्रारही दिली

सोमय्यांवर हल्ला

  1. शनिवारची रात्र राणा दाम्पत्याला खार पोलीस स्थानकातच काढावी लागणार होती
  2. दरम्यान रात्री भाजप नेते किरीट सोमय्यांनी खार पोलिस स्थानकाला भेट दिली
  3. राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी ते गेले होते
  4. खार पोलिस स्थानकाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांमध्ये आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली
  5. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले
  6. किरीट सोमय्यांनी गाडी अंगावर घातल्यामुळे शिवसैनिकांनी हल्ला केला, असा आरोप विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला
  7. दरम्यान, सोमय्यांच्या गाडीवर दगड आणि चप्पल भिरकावण्यात आला
  8. एक दगड गाडीची काच फोडून सोमय्या आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या माणसाला लागला
  9. सोमय्यांच्या चेहऱ्यावर गाडीतील खिडकीच्या फुटलेल्या काचांमुळे जखमा झाल्या, त्यांच्या हनुवटीतून रक्त वाहू लागलं
  10. सोमय्या अस्वस्थ झाले, ते कुणाशीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता..
  11. गाडीवर भिरकावलेला दगड तसाच आत गाडीच्या सीटवर पडून होता
  12. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सोमय्यांनी गाडीतच बसून राहत नंतर भाजपच्या नेत्यांचे विचारपूस करण्यासाठी आलेले फोन घेतले

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.