AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकण रेल्वे विद्युतीकरण होऊनही अंधारातच चाचपडतेय…

जुलै महिन्यात काेकण रेल्वे मार्गावर मालगाडीच्या इंजिनाचा पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून वायर तुटल्याने काेकण रेल्वेची वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. आता काल दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे.

कोकण रेल्वे विद्युतीकरण होऊनही अंधारातच चाचपडतेय...
konkan-railwayImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Nov 26, 2022 | 1:16 PM
Share

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : कोकण रेल्वेने मोठ्या गाजावाजा करीत विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे जाहीर केले. मात्र विद्युतीकरण पूर्ण होऊन आठ महीने झाले तरी कोकण रेल्वे (Kokan Railway) अंधारातच चाचपडत असल्याचे वारंवारं होणाऱ्या तांत्रिक बिघाडाने दाखवून दिले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी यंदा भव्य सोहळ्यात 20 जून रोजी बंगलुरू येथून हिरवा झेंडा दाखवून कोकण रेल्वेच्या लोकार्पित केलेल्या विद्युतीकरणाचे गाैडबंगाल कायम आहे.

दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान काल ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे (Kokan Railway) मार्गावरील अनेक गाड्यांना फटका बसला आहे. शनिवारी मांडवी एक्सप्रेसही या गोंधळामुळे उशीराने रवाना झाली आहे. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

कोकण रेल्वेच्या 741 कि.मी.च्या मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण यंदा मार्चमध्ये पूर्ण झाले झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे डीझेल इंजिनाऐवजी कोकण रेल्वेच्या गाड्या वीजेवरील इंजिनांव्दारे धावण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यामुळे चाकरमान्यांची हवा आणि ध्वनीच्या प्रदूषणातून संपूर्णपणे मुक्तता होणार असल्याचे कोकण रेल्वेने म्हटले होते, परंतू कोकण रेल्वेवर अजूनही अनेक गाड्या जु्न्याच इंजिनाच्या आधारे चालविण्यात येत आहेत.

कोकण रेल्वे वीजेवर जरी धावत असली तरी तिच्याकडे पुरेसी इलेक्ट्रीक इंजिन नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्युतीकरणाचा म्हणावा तसा फायदा ना रेल्वेला होत आहे, ना प्रवाशांना असे सूत्रांचे म्हणणे आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अलिकडे अहमदनगरातील मार्गावरील नगर ते आष्टी डेमू सेवेचे उद्घाटन करताना 2023 पर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण होणार असल्याची घोषणा केली होती.

सध्या वेगवान गाड्यांना जुनी डिझेल इंजिन (लोको ) लावून गाड्या चालविण्यात येत आहेत, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. रेल्वे विद्युतीकरणाचा धडाका लावला असला तरी त्यातुलनेत इंजिनांची निर्मिती केली नसल्याने ही वेळ आल्याचे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.