गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत 1044 एसटी बस आरक्षित

| Updated on: Jul 31, 2021 | 12:52 PM

Konkan ST bus | यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे 2200 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, गणेशोत्सवासाठी 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील.

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत 1044 एसटी बस आरक्षित
एसटी बस
Follow us on

मुंबई: गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते.

मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे 2200 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, गणेशोत्सवासाठी 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2021 दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील.

आतापर्यंत 1044 बसेस आरक्षित

पालघर विभाग – 76
ठाणे विभाग – 283
मुंबई विभाग – 200
रायगड – 14
रत्नागिरी 380
सिधुदुर्ग 7
मुंबई प्रदेश 951
पुणे प्रदेश 91

या बसेससाठी 16 जुलै 2021 पासून आरक्षण प्रक्रिया सुरु झाली असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या:

कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांचे दानवेंना साकडे

बाप्पा पावला! गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून स्पेशल गाड्या