
2100 installment for Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता आली आहे.मध्यप्रदेश सरकार या भाऊबीजाला बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करणार आहे. राज्यातील महिलांना या भाऊबीजीला ऑक्टोबरचा हप्ता मिळेल की नाही याची कोणतीही अधिकृत माहिती सोर आलेली नाही. पण लाभार्थ्यांना 1500 रूपयांऐवजी 2100 रुपयांचा सन्माननिधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे.
योजना बंद होणार नाही
मंत्री नरहरी झिरवल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना 21 ते 65 वर्षे वयातील महिलांना आर्थिक मदत करते. याचा लाभ राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना होणार असल्याचे ते म्हणाले. ही योजना सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरमहा लाभार्थ्यांना 1,500 रुपयांची मदत करण्यात येते.
2100 रुपये हप्ता होणार?
मंत्री नरहर झिरवळ यांनी या योजनेविषयी मोठे संकेत दिले आहे. गरज पडल्यास सन्मानिधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजीत सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे आता 2100 रुपये हप्ता कधी मिळेल याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
57 महिलांना कर्ज पुरवठा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांना आता कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेने व्यावसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्ज पुरवठा केला आहे. त्या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले. हा कर्ज धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ असल्याची प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सुद्धा लवकरच ही योजना लागू करण्यात येणार आहे.
अशी करा ई-केवायसी
माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी ladakibahin.maharashtra.gov.in या साईटवर जा.
लॉगिननंतर e-KYC वर क्लिक करा. e KYC फॉर्म भरा.
लाभार्थी बहिणीने फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि Captcha Code टाका.
आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन Send OTP वर क्लिक करा.
आता तुमच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाका आणि Submit बटण दाबा.
पुढे पात्र बहिणीने पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक आणि Captcha Code नोंदवा
आता पुन्हा संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit बटणावर क्लिक करा.