अभिनेत्रीचे अश्लील फोटो पोस्ट, ‘लगावेलू लिपिस्टिक’ फेम पवन सिंगविरोधात गुन्हा

भोजपुरी गायक पवन सिंगने आपल्यावर मैत्री कायम ठेवण्यासाठी दबाव टाकला होता, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची धमकी दिली होती, असा आरोप 25 वर्षीय अभिनेत्रीने केला आहे.

अभिनेत्रीचे अश्लील फोटो पोस्ट, 'लगावेलू लिपिस्टिक' फेम पवन सिंगविरोधात गुन्हा

मुंबई : 25 वर्षीय अभिनेत्रीबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट करत तिचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी भोजपुरी गायक-अभिनेता पवन सिंग (Bhojpuri Singer Pawan Singh) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘लगावेलू जब तू लिपिस्टिक’ या गाण्यामुळे पवन सिंग प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबईतील मालवणी पोलिसात पवन सिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पवन आपल्यासोबत मैत्री कायम ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तसं न केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची धमकी त्याने दिल्याचा आरोप तक्रारदार तरुणीने केला आहे.

व्यावसायिक स्पर्धेतून पवन सिंग आणि त्याचा सहकारी विष्णू तिवारी उर्फ सुर्या भैया अभिनेत्रीला धमकावत असल्याचं म्हटलं जात आहे. पवनसिंगसोबत संबंधित अभिनेत्रीची जोडी पडद्यावर झळकली होती, मात्र काही कारणामुळे दोघांमध्ये वितुष्ट आलं.

मालाडमधील मालवणी पोलिसांनी कलम 509 आणि 354 आणि आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन सिंगला आतापर्यंत अटक झालेली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI