Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांची मोठी मागणी
Gunratna Sadavarte : गुरुवारी रात्री दर्शनरांगेत उभं असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. दुसरी घटना काळाचौकी महागणपती मंडपाजवळ घडली. शनिवारी लालबाग-काळाचौकी परिसरात मोठी गर्दी झाली होती.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी : सध्या मुंबापुरीत गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. मोठ्या संख्येने गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत. लालबाग, काळाचौकी, परळ या भागात गणेश भक्तांची मोठी गर्दी आहे. या भागात सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा गजर ऐकायला मिळतोय. पण यंदाच्या गणेशोत्सवात लालाबाग, काळाचौकी या भागात दोन दुर्घटना घडल्या. त्यात काही मृत्यू झाले. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. जयदीप मेघराज नेमाडे हा तरुण जळगावहून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला होता. पण ही त्याची अखेरची यात्रा ठरली. दर्शन रांगेत उभा असताना जयदीपचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो पुन्हा जळगाव येथे परतलाच नाही. जयदीप फक्त 25 वर्षांचा होता. जयदीप एक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक होता.
गुरुवारी रात्री दर्शनरांगेत उभं असतानाच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. दुसरी घटना काळाचौकी महागणपती मंडपाजवळ घडली. शनिवारी लालबाग-काळाचौकी परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. महागणपती मंडपाजवळ 5 जणांना शॉक लागला. एकूण 5 जणांना मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात 2 मुलं आणि 3 मुली होत्या. सर्व जण 8 ते 20 वयोगटातील होते. काळचौकीच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला.
कुठे-कुठे तक्रार केली?
आता या दोन्ही दुर्घटनांप्रकरणी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मोठी मागणी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी होम सेक्रेटरी, पोलीस महासंचालक, काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार केली. लालबाग राजा येथे एका तरुणाचा मृत्यू आणि काळाचौकी महागणपती मंडपाजवळ शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांनी होम सेक्रेटरी , पोलिस महासंचालक, काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
उद्या ते हायकोर्टात याचिका दाखल करणार
उद्या ते हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. नुकसानभरपाई म्हणून मृतांना 1 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. लालबागच्या राजा मंडळाला आरोपी करा, काळाचौकी गणपती मंडळाला आरोपी करा अशी मागणी केली आहे. जे धक्काबुक्की करतात त्यांना आरोपी करा असं त्यांनी म्हटलय.
