लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 7 लाख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं ‘हे’ आवाहन

भारतरत्न लता मंगेशकर यांनी कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. Lata Mangeshkar Chief Minister Relief Fund

लता मंगेशकरांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 7 लाख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं 'हे' आवाहन
लता मंगेशकर उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 12:27 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्य सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येते आहेत. महाराष्ट्रात सरकारनं कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी विशेष सहायता निधी निर्माण केलाय. भारतरत्न लता मंगेशकर यांनी कोविड १९ साठीच्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ( Lata Mangeshkar donated seven lakh rupees to Maharashtra Chief Minister Relief Fund for fight against corona)

सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मदत

महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना समर्थपणे करतोय. कोविड १९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ही मदत प्राप्त झाली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

कोरोनाच्या लढ्यात मदत देऊन सहाय्य करा

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीला मदत कशी करायची?

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी https://cmrf.maharashtra.gov.in/index ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम जमा करण्याबाबत माहिती उपलब्ध होईल.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे

मुख्यमंत्री सहायता निधी:कोविड 19 बँकेचे बचत खाते क्रमांक: 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई: 400023 शाखा कोड: 00300 आयएफएससी कोड: SBIN0000300

क्यूआर कोड स्कॅन करुन देखील मदत

मुख्यमंत्री सहायता निधीच्या https://cmrf.maharashtra.gov.in/index वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक क्यूआर कोड पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या बँक किंवा कोणत्याही पेमेंट अ‌ॅपद्वारे क्यू आर कोड स्कॅन करुन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करु शकता. या वेबसाईटच्या मुखपृष्टावरील ऑनलाईन देणगी या पर्यायावर क्लिक करुन देखील मदतनिधी जमा करता येईल. व्यक्तिगत, संघटना, विश्वस्त संस्था, कंपन्या यापैकी एक पर्याय निवडा त्यानंर मदतनिधीचा प्रकार निवडा आणि पुढे जावा. तुमची संपूर्ण माहिती भरा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं यूपीआय किंवा डेबिट कार्डद्वारे मदतनिधी जमा करा. त्यानंतर तुम्हाला पावती उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या:

Maharashtra Fights Corona: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम कशी द्यायची? वाचा सोप्या टिप्स

उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या ‘या’ दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी मानले आभार

(Lata Mangeshkar donated seven lakh rupees to Maharashtra Chief Minister Relief Fund for fight against corona)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.