तीन पक्षांचं सरकार सांभाळणं हा महाविकास आघाडीचा प्राधान्यक्रम, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर; दरेकरांचा घणाघात

सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे, त्यामुळे पोलिसांनाही काम करणं कठीण झालं आहे, असा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला.

तीन पक्षांचं सरकार सांभाळणं हा महाविकास आघाडीचा प्राधान्यक्रम, त्यामुळे महिला सुरक्षा वाऱ्यावर; दरेकरांचा घणाघात
प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 5:15 PM

मुंबई : सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे, त्यामुळे पोलिसांनाही काम करणं कठीण झालं आहे, पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, असा घणाघात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. (Leading a three-party government is priority of the Mahavikas Aghadi, so women’s security is not important for them : Pravin Darekar)

भाजपा महिला आघाडीच्या वतीने साकीनाका घटनेतील विकृत नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबई भाजपा मोर्चाच्या वतीने पवई पोलिस स्टेशनच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा-नगरसेविका शितल गंभीर, नगरसेवक जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, जतीन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली, त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या महिला सुरक्षा व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त केली. राज्यातील महिलांप्रती राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील असल्यामुळे गेली दोन वर्षे राज्य महिला आयोगावर नेमणुका सरकारने केल्या नाहीत. महिला आयोगावरील नेमणुकांची फाईल उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते सही करत नाहीत. यावरून महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

पोलीस आयुक्त हतबल

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बलात्काराच्या घटनेनंतर ‘आम्ही कुठेकुठे पोलीस ठेऊ?’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना दरेकर म्हणाले, मुंबई पोलीस दलाचे प्रमुखच जर अशा प्रकारे हतबलता दाखवत असतील तर पोलीस दलाने काय कारायचे ? पोलीस दलामध्ये ऊर्जा निर्माण करून महिला सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश देण्याऐवजी पोलीस आयुक्त हतबलता व्यक्त करीत आहेत, हे अतिशय लाजिरवाणे आहे.

दोन दिवसात महिला सुरक्षेचा कृती आराखडा जनतेसमोर मांडा

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच सरकारला शरम आणणारी घटना साकीनाक्यात घडली आहे. आतातरी सरकारने डोळे उघडून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, जोपर्यंत सरकार महिला सुरक्षेबाबतचा ॲक्शन प्लॅन महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवणार नाही तोपर्यंत भाजपा महिला आघाडी राज्यभर आंदोलन करील, असा इशाराही प्रविण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.

इतर बातम्या

उत्तर प्रदेशात 403 ऐवजी 100 जागा लढवणार, 24 तासात शिवसेना बॅकफूटवर; महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या सेना नेत्यांमध्ये संभ्रम?

गोवा, उत्तर प्रदेशात मविआचा प्रयोग; गोव्यात 20 तर उत्तर प्रदेशात 100 जागा लढवणार; संजय राऊत यांची घोषणा

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

(Leading a three-party government is priority of the Mahavikas Aghadi, so women’s security is not important for them : Pravin Darekar)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.