AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde: शिंदे-फडणवीस जोडी तेंडुलकर-कांबळीसारखी, मुख्यमंत्री दिवसातून किती तास करतायेत काम? टीकेला आशिष जैस्वालांनी दिलं हे उत्तर.

त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्याप्रमाणे असल्याचे वक्तव्यही केले आहे. ही जोडी सचिन तेंडुलकरप्रमाणे निर्णयांचे फोर, सिक्स मारत असल्याचे जैस्वाल म्हणाले. हे दोघेही राज्यासाठी चांगले निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे.

CM Eknath Shinde: शिंदे-फडणवीस जोडी तेंडुलकर-कांबळीसारखी, मुख्यमंत्री दिवसातून किती तास करतायेत काम? टीकेला आशिष जैस्वालांनी दिलं हे उत्तर.
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jul 26, 2022 | 4:21 PM
Share

मुंबई- राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion)झालेला नसल्याने, राज्य सरकारची कामे प्रलंबित आहेत, मंत्रालयातील (Mantralaya) मंत्र्यांच्या खात्यांची कामे ठप्प आहेत, असा आरोप करणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकनाथ शिंदे समर्थक आमदार आता उत्तर देत आहेत. सरकारचे (Shinde Government)काम व्यवस्थित सुरु असल्याचे बंडखोर आमदार आशिष जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. विरोधक कितीही खोटे बोलत असले तरी सराकरचे काम व्यवस्थित सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिंदे गट आणि भाजपा एकत्र आले हे राज्यातील जनतेला आवडलेले नाही या विरोधकांच्या टीकेलाही जैस्वाल यांनी उत्तर दिले आहे. शिंदे गट आणि भाजपा एकत्र येणे ही बाब राज्यातल्या जनतेला आवडली असल्याचे जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी कितीही पराचा कावळा केला तरी राज्यातील जनता ही एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याचेही जैस्वाल म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री दिवसरात्र झटत आहेत-जैस्वाल

राज्यात पूरस्थिती सारखी गंभीर स्थिती असतानाही, सर्व पातळ्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झटत आहेत, असेही आशि, जैस्वाल यांनी सांगितलेले आहे. सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसातून २०-२० तास काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. २४ तास उपलब्ध असलेला मुख्यमंत्री या शब्दांत यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिंदे यांचे कौतुक केलेले होते. आधीच्या ठाकरे सरकारप्रमाणे परिस्थिती नसेल आता मुख्यमंत्री सदैव उपलब्ध असतील असे एकनाथ शिंदेंनीही सांगितलेले होते.

शिंदे-फडणवीस जोडीला तेंडुलकर-कांबळी जोडीची उपमा

एवढ्यावरच आशिष जैस्वाल थांबलेले नाहीत. त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्याप्रमाणे असल्याचे वक्तव्यही केले आहे. ही जोडी सचिन तेंडुलकरप्रमाणे निर्णयांचे फोर, सिक्स मारत असल्याचे जैस्वाल म्हणाले. हे दोघेही राज्यासाठी चांगले निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल, यावर वरिष्ठच सांगू शकतील असे सांगत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका

३० जूनला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता २६ दिवस उलटले तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावरुन विरोधक सातत्याने सरकारवर दोन जणांचे मंत्रिमंडळ म्हणून टीका करीत आहेत. राज्यात पूरस्थिती असताना अधिवेशन लवकर बोलवायला हवे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर शिंदे-फडणवीस हे दिल्लीत चर्चेत व्यग्र आहेत आणि दुसरीकडे राज्याला मात्र कुणीही वाली राहिला नसल्याची टीकाही करण्यात येते आहे.

Follow Us
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?