नीलम गोऱ्हे नव्हे… विदर्भातील या नेत्याला मोठी संधी, एकनाथ शिंदे यांचे पुन्हा एकदा धक्कातंत्र? विधान परिषद उपसभापती कुणाचे पुनर्वसन?

Shiv Sena Krupal Tumane: विदर्भातील सेना नेते कृपाल तुमाने यांना संयमाचे फळ मिळाले आहे. खासदारकी गेल्यानंतर आणि मंत्रिमंडळात संधीही हुकल्यानंतर त्यांनी संयम ठेवला. त्यानंतर आता त्यांना विधान परिषदेत मोठी संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे.

नीलम गोऱ्हे नव्हे... विदर्भातील या नेत्याला मोठी संधी, एकनाथ शिंदे यांचे पुन्हा एकदा धक्कातंत्र? विधान परिषद उपसभापती कुणाचे पुनर्वसन?
एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे, कृपाल तुमाने
Image Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Jun 30, 2026 | 11:29 AM

Shiv Sena Krupal Tumane Legislative Council Deputy Chairman opportunity: विदर्भातील शिंदे सेनेचे मोठे नेते कृपाल तुमाने यांना मोठी संधी मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. कृपाल तुमाने यांच्या खासदारकीचे तिकीट कापल्या गेले. त्यानंतर ते आमदार झाले. फडणवीस मंत्रिमंडळात मोठी संधी मिळेल असेल वाटत असताना ते वंचित राहिले. पण आता त्यांच्या वाट्याला आलेला दुष्काळ संपला आहे. विधान परिषदेत त्यांना लवकरच मोठी संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. काय आहे मोठी अपडेट?

विधान परिषद उपसभापति पदाची माळ?

विधान परिषद उपसभापती पद एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सेनेकडुन कृपाल तृमाने यांना संधी देण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. उत्तर महाराष्ट्रातूनही चंद्रकांत रघुवंशी हे इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या समर्थनार्थ उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी पाठिंबा दिल्याचे समजते. पण विधान परिषद उपसभापति पदाची माळ ही कृपाल तुमाने यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता दाट आहे. त्यांना अगोदर मंत्रि‍पदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यांच्या हाती केवळ प्रतिक्षा आली. त्यामुळे आता त्यांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर ठाकरे गटाकडून या पदासाठी ज. मो. अभ्यंकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. संख्याबळ नसले तरी निवडणूक लढवणार असल्याची भूमिका आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे.

तुमाने यांना न्याय देण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने यांना विधान परिषद उपसभापती पद देण्याचे निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तुमाने हे 2014 आणि 2019 मध्ये रामटेक मतदारसंघातून लोकसभेत गेले होते. पण नंतर भाजपने त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर ते आमदार झाले. पण मंत्रि‍पदाने त्यांना हुलकावणी दिली. शिंदेंनी त्यांना विधान परिषद आणि मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळात स्थान दिले नसले तरी तुमाने यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली नाही. त्यांची नाराजी पक्ष नेतृत्वाला कळली. त्यानंतर आता त्यांना विधान परिषद उपसभापती पदाची संधी मिळणार असल्याचे पक्के मानले जात आहे.

Follow Us