केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही ग्वाही दिली. (cm uddhav thackeray)

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 2:21 PM

मुंबई: केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. (maha vikas aghadi with farmer,cm uddhav thackeray assured)

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही ग्वाही दिली. केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्या हक्काचं सरकार आहे. तुमच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे, असं सांगतानाच शेतकरी राज्याचं वैभव आहे. आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठी आहे. अन्नदाता आणि जीवदाता एकच आहेत. आर्थिक संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत करणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

प्रयोगशील व्हा

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना प्रयोगशील होण्याचं आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने जपानमधील आंबा पिकवल्याची बातमी दाखवली. तुम्ही प्रयोगशील व्हा. तुमच्या प्रयोगासाठी आम्ही मदत करू. शेतीक्षेत्रासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू, असं सांगतानाच शेतकरी कायमचा चिंतामुक्त झाला पाहिजे. त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये. ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील तेव्हाच राज्यात हरित क्रांती झाली असं म्हणता येईल, असं ते म्हणाले.

हमी नव्हे हमखास भाव मिळायला हवा

शेतकऱ्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळालाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आपल्या सरकारच्या टीमच्या कामाला दाद देत असताना लाखो शेतकऱ्यांचेही कौतुक आहे. सोन्यासारखे पीक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते. अशा अनिश्चित परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही कामकाजाची सुरुवात पीक कर्ज मुक्तीपासून केली. नंतर कोरोनाचे संकट आले. पण शेतकऱ्याने अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले त्याचे उपकार विसरता येणार नाही. आम्ही विकेल ते पिकेल ही योजना घेऊन आलो. जे पिकवीन ते विकल्या गेलेच पाहिजे असे ठरवले, असंही त्यांनी सांगितलं. (maha vikas aghadi with farmer,cm uddhav thackeray assured)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, पवार म्हणतात, निवडणुकीबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा!

‘ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज, 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र पुरवतो’, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा सवाल

(maha vikas aghadi with farmer, cm uddhav thackeray assured)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.