BREAKING : संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? विधिमंडळात मोठ्या घडामोडी, कारवाई होणारच?

संजय राऊत (Sanjay Raut) यांना घेरण्यासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. संजय राऊत एका वाक्यामुळे गोत्यात सापडले आहेत. त्यांच्या एका वक्तव्याने त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

BREAKING : संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? विधिमंडळात मोठ्या घडामोडी, कारवाई होणारच?
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 5:13 PM

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे आमदार संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना हे विधीमंडळ नाही चोर मंडळ आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षाचे आमदार आज विधानसभा आणि विधान परिषदेत आक्रमक झाले. संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर विधीमंडळात वेगाने घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने विधीमंडळाबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यांच्याकडून पुन्हा असं वक्तव्य होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलीय. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे मित्रपक्षाच्या नेत्यांनीदेखील राऊतांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार राऊतांवर कारवाई करण्यासाठी आग्रही आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समितीसाठी नावे मागवली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधीमंडळात वेगाने घडामोडी घडत आहेत. सर्वात आधी सत्ताधारी पक्ष आता विधीमंडळातील महाविकास आघाडी सरकाच्या काळातील हक्कभंग समिती बरखास्त करणार आहे. त्यानंतर नव्याने विधीमंडळ हक्कभंग समिती नेमली जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधीमंडळ पक्षांकडून नावे मागवली आहेत. या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांच्या नावांची चर्चा आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची वाढती मागणी पाहता त्यांच्याविरोधात कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे राऊतांवर कारवाई करण्याआधी त्यांना 10 मार्चला आपली बाजू मांडण्यासाठी बोलावलं जाण्याची दाट शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. राऊतांवरील या कारवाईवर आता ठाकरे गटाकडून काय भूमिका येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हक्कभंग समितीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने नावे दिली

दरम्यान, हक्कभंग समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रस पक्षाकडून नावे देण्यात आली आहे. या समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन राऊत, सुनिल केदार यांची नावं देण्यात आलंय.राष्ट्रवादी काँग्रेसकडून सु्निल भुसारा, दिलीप मोहिते यांच्या नावाची शिफारस करण्यात आलीय.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.