AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक सरकारला घेणार? आणखी कोणते मुद्दे महायुतीला आणणार अडचणीत?

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणणार आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे अधिवेशनात विरोधक सरकारला या मुद्यावरुन जाब विचारणार आहे.

लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक सरकारला घेणार? आणखी कोणते मुद्दे महायुतीला आणणार अडचणीत?
Maharashtra Assembly
| Updated on: Jun 30, 2025 | 11:24 AM
Share

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तीन आठवड्यांचे हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत चालणार आहे. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकून सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग, लाडकी बहीण योजना, शेतमालाला हमीभाव, महागाई, रोजगार, गैरव्यवहार यासारख्या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत.

शक्तीपीठवर सत्ताधारी आमदार सरकारची कोंडी करणार

नागपूर-गोवा द्रुतगती मार्ग म्हणजेच शक्तीपीठ द्रुतगती मार्गला सरकारने मंजुरी दिली. ८०२ किलो मीटर लांब या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून नेण्यास या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा विरोध डावलून महामार्गाचे काम रेटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे अधिवेशनात या महामार्गाच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारची कोंडी करू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक सरकारला अडचणीत आणणार आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना निधी देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्यामधील पैसे सरकार वापरत आहे. त्यावरुन विरोधी पक्ष सरकारचे वाभाडे काढण्याची शक्यता आहे.

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजणार

महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दाही मांडला होता. परंतु अजूनही त्याबाबत निर्णय झाला नाही. यामुळे विरोधी पक्षाकडून अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अध्यक्ष असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीचा पहिलाच धुळे दौरा वादग्रस्त ठरला होता. समितीच्या या दौऱ्यात शासकीय विश्रामगृहावर कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असली तरी यानिमित्ताने विधिमंडळ समित्यांच्या कामकाजाकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. विरोधी पक्ष या प्रकरणावरून सरकारवर तुटून पडण्याच्या तयारीत आहेत.

विरोधक या मुद्यांवरुन सरकारला घेणार

  • पुण्यातील हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
  • मे, जून महिन्यातील पावसाचा मुंबई, पुण्यातील जनजीवनाला बसलेला फटका
  • पुण्यात तळेगाव जवळच्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू
  • इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला गोंधळ
  • संदिपान भूमरे यांच्या चालकाकडील संपत्तीचा मुद्दा
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.