मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती खात्रालीयक सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या 12 किंवा 13 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिलीय. खरंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहीला आहे. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर अनेकदा निशाणा साधण्यात आलाय. सरकार स्थापन होऊन चार महिने होत आली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही? असा सवाल करत विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवगळे दावे केले. काही नेत्यांनी तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागण्याचं भाकीत केलंय. या सगळ्या दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.