Weather Update: महाराष्ट्र गारठला; शेकट्या पेटल्या, स्वेटर, मफलर बाहेर, राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षाही थंड

Maharashtra Weather Update: राज्यात थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रातील 17 शहरातील पारा महाबळेश्वरपेक्षाही अधिक घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे हिवाळ्यात राज्यात थंड हवीची ठिकाणं वाढल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी थंडीमुळे शेकोट्या पेटल्या आहेत.

Weather Update: महाराष्ट्र गारठला; शेकट्या पेटल्या, स्वेटर, मफलर बाहेर, राज्यातील 17 शहरं महाबळेश्वरपेक्षाही थंड
महाराष्ट्र गारठला
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Dec 12, 2025 | 8:54 AM

IMD Weather Update: उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळं महाराष्ट्र गारठला आहे. राज्याला हुडहुडी भरली आहे. राज्यभरातील नेक शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास अथवा त्यापेक्षा खाली उतरले आहे. अति गारठ्यामुळे राज्यातील १७ शहरांचं तापमान महाबळेश्वर या थंडीच्या ठिकाणापेक्षाही कमी झाले आहे. महाराष्ट्र थंडीने गपगार झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. तर स्वेटर, टोपी, मफलर बाहेर आली आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

राज्यात हुडहुडी वाढली, अहिल्यानगर @ ६.६

सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगर मध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला आहे. उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट असेल. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा ७ ते १० अंशांपर्यंत खाली आले आहे. अहिल्यानगरमध्ये ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी परभणी तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतके आहे. हवामान विभागाने पुढचे काही दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)

अहिल्यानगर: ६.६

पुणे: ७.९

जळगाव: ७.०

कोल्हापूर: १४.४

महाबळेश्वर: ११.१

मालेगाव: ८.८

नाशिक: ८.२

सांगली: १२.३

सातारा: १०.०

सोलापूर: १३.२

छत्रपती संभाजीनगर: १०.८

परभणी: १०.४

अकोला: १०.०

अमरावती: १०.२

बुलढाणा: १२.२

गोंदिया: ८.०

नागपूर: ८.१

वर्धा: ९.९

यवतमाळ: १०

दोन दिवसात महाराष्ट्र गारठणार

पुढील 2 दिवसांत सरासरी सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील 48 तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने 1६ जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

थंडीचा परिणाम कोणत्या जिल्ह्यावर होणार

मराठवाडा:

जालना, परभणी, बीड, नांदेड आणि लातूर

विदर्भ:

गोंदिया, नागपूर

उत्तर महाराष्ट्र:

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर

पश्चिम महाराष्ट्र:

पुणे, सोलापूर

श्वसनाचे आजार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

पुण्याच्या पारा 7.9 अंशावर, हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

पुण्यात तापमान कमी झाल्यामुळे सकाळी थंडी वाढली असताना हवेत दिवसभर गारवा वाढलं आहे. पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली नोंदवला गेला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आहे. त्यामुळे पुण्याच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढल्याचा हवामान विभागाने म्हटले आहे

सातपुडा परिसरात थंडीची लाट

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसर गारठला आहे. तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसने खाली आला आहे. सातपुडा पर्वत रांगेतील धडगाव, तोरणमाळ, डाब आणि मोलगी या भागात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. सायंकाळी ६ वाजेपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत सातपुड्यात गारठा कायम आहे. तापमानात अचानक घट पारा ८ अंश सेल्सिअस ने खाली आला आहे. पुढील काही दिवसात तापमानात घट होऊन गारठा अजून वाढण्याची शक्यता आहे.