AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Corona Report : राज्यात 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मुंबई, पुणे, नाशिकमधील स्थिती काय?

राज्यातील मंगळवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 हजार 182 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Maharashtra Corona Report : राज्यात 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मुंबई, पुणे, नाशिकमधील स्थिती काय?
दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग आणि कोव्हिडसदृश लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करुन पॉझिटीव्ह आल्यास विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात येते.
| Updated on: Mar 09, 2021 | 10:26 PM
Share

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.(9 thousand 927 new patients of Corona in the state, report of condition in Mumbai, Nashik, Pune)

राज्यातील मंगळवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर राज्यात गेल्या 24 तासांत 9 हजार 927 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 हजार 182 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण 95 हजार 322 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.34 टक्कांवर पोहोचलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

मुंबईतील कोरोनाची स्थिती काय?

मुंबईकरांवर सध्या लॉकडाऊन लादण्याची गरज नाही, असं सांगतानाच मुंबईकरांनी गांभीर्याने कोरोनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काल 23000 कोविड चाचण्या करण्यात आल्या. याआधी जानेवारीत 10 ते 12 हजार चाचण्या होत होत्या. आता त्या सातत्याने वाढवत नेत आहोत, असं सांगतानाच मुंबईत दर 100 चाचण्यांमागे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट हा 6 टक्के आहे, असं चहल म्हणाले. इतर ठिकाणचा पॉझिटीव्हिटी रेट मुंबईपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लॉकडाऊन संदर्भात विचार होऊ शकतो. मात्र, मुंबईत ती स्थिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील कोरोनाची आकडेवारी पाहिली तर गेल्या 24 तासांत मुंबईत 1 हजार 12 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 1 हजार 51 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दिवसभरात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 10 हजार 736 आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93 टक्के आहे.

पुण्यात कोरोनाचा उद्रेक

पुण्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 86 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 795 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 5 जण हे पुण्याबाहेरील आहे. सध्या पुण्यात 321 गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नाशिकमध्ये कोरोनाची काय स्थिती?

नाशिकमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. इतकच नाही तर नाशिकमधील धार्मिक स्थळांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसंच शनिवार आणि रविवारी सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra corona report today : जळगावात जनता कर्फ्यू, नाशिकमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद, बुलडाण्यात टाळेबंदी

मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण…; महापालिका आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा

9 thousand 927 new patients of Corona in the state, report of condition in Mumbai, Nashik, Pune

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.