
महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी जी शाई वापरली जातेय त्या बद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांनी मतदानासाठी बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईवर आक्षेप घेतला आहे. मतदान केल्यानंतर काही वेळाने ही शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शाई निघत असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. “केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरतोय, तीच शाई आम्ही वापरतोय. ही शाई काढता येत नाही” असा दावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला. एकदा मतदान करुन गेल्यानंतर पुन्हा मतदान करण्यासाठी एखादा आला, तर मतदान केंद्र अधिकारी त्यावर नक्कीच कारवाई करेल असं दिनेश वाघमारे म्हणाले.
“बोटावरची मतदानाची शाई पुसली जातेय हा संभ्रम पसरवला जात आहे. ही शाई आम्ही 2011 पासून वापरतोय. मार्कर पेन वापरतोय. याच निवडणुकीत अशाच प्रकारचा संभ्रम पसवरणं चुकीच आहे. लोकसभा, विधानसभेच्यावेळी सुद्धा अशाच प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. शाई ड्राय झाल्यानंतर पुसली जात नाही. 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचं मार्कर पेन वापरत आहोत.कोरस कंपनीच मार्कर पेन वापरत नाहीय” असं दिनेश वाघमारे म्हणाले.
Kolhapur Election Exit Poll 2026 : कोल्हापूरमध्ये महायुतीची सत्ता...
BMC Election Exit Poll 2026 : ठाकरे बंधूंसह पवारांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का...
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
अभिनेते मकरंद देशपांडेंकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
मुंबईत तर दोन ओळखपत्र मागितली जात आहेत
“माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे. त्यांची शाई टिकून आहे. पुसली गेलेली नाही” असं राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. “दुबार मतदारांच्या बाबतीत त्यांची ओळख पटवल्याशिवाय त्यांना मतदान करुन दिलं जात नाहीय. मुंबईत तर दोन ओळखपत्र मागितली जात आहेत. त्याशिवाय उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्रात आहेत. ते त्याच मतदारसंघातले आहेत” असं दिनेश वाघमारे दुबार मतदानाच्या मुद्यावर म्हणाले. “2011 पासून आम्ही जी शाई वापरतोय तीच आता वापरली आहे. एकाच कंपनीचा मार्कर पेन आहे. फेक नरेटिव पसरवलं जात आहे” असं राज्य निवडणूत आयुक्त म्हणाले. मुंबईत काही ठिकाणी मतदानानंतर शाई पुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावर राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं.