Party Wise Maharashtra Election 2026 Exit Poll: झोपच उडाली… मुंबईत सत्तापालट? राज्यातील एक्झिट पोलच्या आकड्याने मोठी खळबळ
Party Wise Maharashtra Election 2026 Exit Poll: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंना धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Party Wise Maharashtra Election 2026 Exit Poll: आज राज्यात 29 महानगरपालिकांसाठी मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरु होते. आता मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल समोर आला आहे. मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. आता राज्यात एकूणच काय परिस्थिती आहे? जाणून घ्या…
मुंबई महापालिकेचा एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानुसार भाजप आणि शिंदे यांच्या युतीला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 62 जागा मिळतीय असे म्हटले जात आहे. भाजपला 42 टक्क्याहून अधिक वोट, ठाकरेंच्या आघाडीला 32 टक्के मते मिळणार तर इतरांना 13 टक्के वोट मिळणार असा अंदाज आहे.
Municipal Election 2026
Mumbai Election 2026 Exit Poll Results LIVE : एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत थेट धक्का...
PCMC Election Exit Poll 2026 : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपा ठरतोय सर्वात मोठा पक्ष..
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
अभिनेते मकरंद देशपांडेंकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन
Nashik Election Poll Percentage : नाशिक महापालिकेसाठी 4.30 वाजेपर्यंत 41 टक्के मतदान
Nanded Election Poll Percentage : नांदेड महापालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत सरासरी 41.65 टक्के मतदान
मुंबई महापालिका (BMC Election Exit Poll 2026)
भाजप-सेना – 138
ठाकरे-मनसे-पवार -62
काँग्रेस-वंचित -20
इतर – 7
पुणे महानगपालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. (Pune Election Exit Poll 2026)
भाजप – 93
शिवसेना- 06
ठाकरे – 07
राष्ट्रवादी – 43
शरद पवार – 08
काँग्रेस -08
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Election Exit Poll 2026)
भाजप – 64
शिवसेना- 09
राष्ट्रवादी – 51
शरद पवार – 02
काँग्रेस -01
मनसे – 01
कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Election Exit Poll 2026)
भाजप – 29-32
शिवसेना – 18-21
राष्ट्रवादी – 9-11
काँग्रेस – 19-23
शरद पवार – 0-1
ठाकरे – 3-4
मनसे -0-1
इतर – 2-4
(टीप- हा फक्त एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्ष मतमोजणी बाकी आहे. 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल.)
