Vijaya Tawde Death | भाजप नेते विनोद तावडे यांना मातृशोक

भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या आई विजया तावडे यांचं मुंबईत निधन झालं आहे. विजया तावडे यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Vijaya Tawde Death | भाजप नेते विनोद तावडे यांना मातृशोक
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 1:57 AM

मुंबई | राजकीय विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असेलले विनोद तावडे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विनोद तावडे यांच्या मातोश्रींचं निधन झालं आहे. विनोद तावडे यांच्या आई विजया श्रीधर तावडे यांनी वयाच्या 85 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. विजया तावडे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. याबाबतची माहिती स्वत: विनोद तावडे यांनी ट्विट करत दिली आहे.

“अत्यंत दु:खाने कळवत आहे की माझी आई विजया श्रीधर तावडे यांचं दीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले आहे”, असं ट्विट करत विनोद तावडे यांनी ही वाईट बातमी दिली आहे. विनोद तावडे यांच्या वडिलानंतर त्यांच्या आईच्या निधनाने तावडे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तावडे कुटु्ंबियांवर शोककळा पसरली आहे. श्रीधर तावडे यांनी नोव्हेंबर 2015 साली जगाचा निरोप घेतला होता.

विजया तावडे यांचं निधन

विजया तावडे यांच्या पश्चात त्यांचा पुत्र विनोद, विलास आणि विवेक अशी 3 मुलं, मुलगी जयश्री, सून, नातवंड असा मोठा परिवार आहे. मिळालेल्या माहितानुसार, विजया तावडे यांची अंत्ययात्रा 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता नेहरु रोड विलेपार्ले पूर्व इथून निघणार आहे.

दरम्यान विनोद तावडे यांच्या आईंचं निधन झाल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शोकाकुल कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड याचं ट्विट

राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मातोश्री विजयाताई श्रीधर तावडे यांचं निधन झाल्याचं दुःखद बातमी समजली .आई जाण्याची वेदना कधीही भरुन न येणारी असते. तावडे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!”, असं ट्विट तर आव्हाडांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.