
Fadnavis Government DA Hike: राज्य सरकारी कर्मचार्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी आनंदवार्ता आली आहे. महागाई वाढल्यामुळे कर्मचार्यांनी भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. राज्याचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे. त्यापूर्वीच कर्मचार्यांना राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवण्याची गुडन्यूज दिली आहे. कर्मचार्यांना महागाई भत्त्याचं गिफ्ट देण्यात आलं आहे. केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाची तजवीज करत आहे. येत्या दोन वर्षात केंद्रीय कर्मचार्यांना गलेलठ्ठ पगार मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांनी सुद्धा पगारात वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यापूर्वी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढीस राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत याविषयीचे निवेदन सादर केले आहे.
महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ
कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धुळवडीचे गिफ्ट दिले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांहून थेट ५८ टक्क्यांवर पोहचला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे. वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील जवळपास ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.
पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता
राज्यातील सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने महागाई भत्ता देण्यात येणार आहे. जुलै २०२५ पासून हा महागाई भत्ता लागू होईल. कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत रक्कम अदा करण्यात येणार आहे. धुळवडीला कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात अजून एका रंगाची भर पडणार आहे. त्यांना महागाई भत्ता वाढीचा आनंद साजरा करता येणार आहे. विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची जयस्वाल यांनी माहिती दिली.
रोखीने देणार महागाई भत्ता
विशेष म्हणजे वाढीव महागाई भत्ता या फेब्रुवारी २०२६ पासून कर्मचाऱ्यांना रोखीत देण्यात येणार आहे. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत थकबाकीची रक्कम देण्यात येईल. ही थकबाकी गुढीपाडव्याला मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल. याविषयीचे स्वतंत्र आदेश देण्यात येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचारी आणि ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचार्यांना लाभ होईल.