AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना ब्रेक, आतषबाजी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई; राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय?

वीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत असाल तर सावधान. राज्य सरकारने नव वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे.

Coronavirus: नवीन वर्षाच्या कार्यक्रमांना ब्रेक, आतषबाजी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई; राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना काय?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 5:46 PM
Share

मुंबई: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करत असाल तर सावधान. राज्य सरकारने नव वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच चौपाट्यांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबतची नवी नियमावलीच जारी केली आहे.

कोरोनाचं संकट असल्यानेच ओमिक्रॉन विषाणूही पसरत आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचं साधेपणाने स्वागत करावे, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

नव्या सूचना काय?

>> 31 डिसेंबर रोजी आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नका. घरीच साधेपणाने नवीन वर्षाचं स्वागत करा.

>> 25 डिसेंबरपासून रात्री 9 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या आदेशाचे पालन करावे.

>> 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या स्वागता करिता आयोजित कार्यक्रमांसाठी बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित परवानगी राहणार आहे.

>>  या कार्यक्रमांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

>> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडणे टाळा.

>> 31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

>> मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाट्यांवर नागरिकांनी गर्दी करू नये.

>> नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मिरवणुका काढू नयेत.

>> नुतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

>> फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे.

संबंधित बातम्या:

खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह, ट्विटरवरून दिली माहिती

Corona Update: मुंबईत पार्ट्यांवर बंदी, तर इमारतीही सील, आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय करायचं, काय नको!

Omicron संसर्गाच्या वाढत्या वेगानं धडकी, दिल्लीनं महाराष्ट्राला मागं टाकलं, देशाची रुग्णसंख्या 781 वर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.