Corona | महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, रुग्णांची संख्या 52 वर

कोरोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला मोठं (Maharashtra corona cases) यश मिळताना दिसत आहे. कारण 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर आहेत

Corona | महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, रुग्णांची संख्या 52 वर

मुंबई : कोरोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला मोठं (Maharashtra corona cases) यश मिळताना दिसत आहे. कारण 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन, निरीक्षणासाठी विलगीकरणात ठेवण्यात येईल, (Maharashtra corona cases)अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. एकीकडे हा दिलासा असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वरुन 52 वर पोहोचली आहे. आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुंबईत 1, पुणे 1 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिलासादायक म्हणजे 5 रुग्ण जे रुग्णालयात अडमिट होते त्यांची प्रकृती सुधारली असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची आजची अपडेट माहिती दिली.


राजेश टोपे म्हणाले, कोरोना आजार बरा होतो. पाच रुग्ण जे पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर उपचारानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना सात ते आठ दिवस विलगीकरणात राहावे लागले.”

महाराष्ट्रातील एकूण संख्या 52 झाली आहे. तीन पेशंट वाढले आहेत. उपचाराचा शंभर टक्के खर्च सरकार करत आहे. महात्मा गांधी जनआरोग्य योजनेअंतर्गगत त्यांना विमाही देत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात आतापर्यंत एकूण 1036 जणांची कोरोना टेस्ट केली आहे. त्यापैकी 971 लोक निगेटीव्ह आहेत. काहींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

आपण लॅब टेस्टिंगची संख्या दिवसाला 2400 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या 12 लॅब कार्यान्वित करायचा प्रयत्न आहे. तीन लॅब सध्या कार्यान्वित आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्य़ासोबत चर्चा करणार आहेत. वर्षा बंगल्यावरुन आम्ही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात काही समस्या आहेत ते आम्ही पंतप्रधानांकडे मांडणार आहे. ते सुद्ध आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

वैद्यकीयसेवा देणार सर्व डॉक्टर्स धोका पत्करुन सेवा  करत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेने सहकार्य करावं, लोकांनी गर्दी करु नये. पंतप्रधान मोदींचा जनता कर्फ्यूचा निर्णय योग्य आहे. सर्वांनी सहभागी होऊन पंतप्रधानांच्या विनंतीला प्रतिसाद देऊ, कोरोनासारख्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी गर्दी टाळणे हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, असं टोपे म्हणाले.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • पिंपरी चिंचवड – 12
 • पुणे – 9
 • मुंबई – 10
 • नागपूर – 4
 • यवतमाळ – 3
 • कल्याण – 3
 • नवी मुंबई – 3
 • रायगड – 1
 • ठाणे -1
 • अहमदनगर – 2
 • औरंगाबाद – 1
 • रत्नागिरी – 1
 • उल्हासनगर – 1
 • एकूण 51

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबईत (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • औरंगाबाद (1) – 15 मार्च
 • पुणे (1) – 15 मार्च
 • मुंबई (3) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • यवतमाळ (1) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • मुंबई (1) – 17 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
 • पुणे (1) – 18 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
 • मुंबई (1) – 18 मार्च
 • रत्नागिरी (1) – 18 मार्च
 • मुंबई महिला (1) – 19 मार्च
 • उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
 • अहमदनगर (1) – 19 मार्च
 • मुंबई (1) – 20 मार्च
 • पुणे (1) – 20 मार्च
 • पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
 • एकूण – 51 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

 • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
 • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
 • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
 • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
 • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

 

संबंधित बातम्या 

Corona positive | मुंबईतील 2 महिला, नगरमधील एकाला लागण

CM LIVE : घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका : मुख्यमंत्री

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI