Corona | शाळा बंद करण्याची अवस्था नाही, एकही क्रिटिकल पेशंट नाही, IPL आयोजकांसमोर 2 पर्याय : आरोग्य मंत्री

कोरोनामुळे घाबरु नका, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं आहे.

Corona | शाळा बंद करण्याची अवस्था नाही, एकही क्रिटिकल पेशंट नाही, IPL आयोजकांसमोर 2 पर्याय : आरोग्य मंत्री
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 8:25 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Health Minister Rajesh Tope). पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कोरोनामुळे घाबरु नका, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं आहे. कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचीदेखील माहिती रोजेश टोपे यांनी दिली. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (11 मार्च) तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बैठक झाली”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

‘शाळांना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही’

“कोरोनाबाबत जास्त काळजी करु नये. मात्र सतर्कता बाळगावी. आपली रोगप्रतिकार क्षमता वाढली तर आपोआप या आजारातून सुटका होते. या आजारावरील मृत्यूदर 2.5 टक्के आहे. या आजाराच्या एकही रुग्णाची प्रकृती क्रिटिकल नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. बैठकीत शाळांच्या बाबतीतही चर्चा झाली. याबाबच सर्व तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यामध्ये हिंदूजा, जसलोक, लिलावती अशा विविध रुग्णालयाचे तज्ज्ञ होते. शाळांना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही. त्याने भीतीचे वातावरण वाढेल. त्यामुळे तूर्तास कोणत्याही शाळेला सुट्टी दिली जाणार नाही”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा : कोरोनाची मुंबईत एन्ट्री, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर

‘लॅबची संख्या वाढवणार’

“मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॅबची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर, मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी सध्या लॅब आहेत. मात्र, कोरोना बाधितांची संख्या वाढत असेल तर लॅब वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही रॅनबॅक्सी लॅब, एसआरएल लॅब आणि औरंगाबादचं मेडीकल कॉलेज या तीन-चार ठिकाणी लॅब वाढवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

‘आयपीएल संदर्भात दोन भूमिका’

दरम्यान, कोरोनामुळे आयपीलचं वेळापत्रक पुढे ढकलणार अशी चर्चा सुरु होती. याबाबत राजेश टोपे यांना विचारले असता, “आयपीएल संदर्भात दोन भूमिका आहेत. एकतर सामने होतील, मात्र गॅलरी पासेस दिले जाणार नाहीत. घरी बसून थेट प्रक्षेपण पाहता येईल किंवा आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात यावा, अशा दोन भूमिका आहे. त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही”, असं राजेश टोपे म्हणाले. याशिवाय राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नाही, असा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“मुंबईत दोन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वीणा वर्ल्डसोबत दुबईत जो ग्रूप गेला होता त्याच गृपमधील ते आहेत. पुण्यातले जे 4 आहेत त्यांच्यासोबत आणखी 2 जणांची संख्या वाढली आहे. याशिवाय आणखी एकावर तसे लक्षण दिसून आले आहेत. मात्र, तो बाधित नाही. त्याचीही तपासणी करण्यात आली आहे”, अशीदेखील माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातमी : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.