AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु, दोन डोस आवश्यक, कॉलेज प्रवेशासाठी नेमकी नियमावली काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (13 ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु, दोन डोस आवश्यक, कॉलेज प्रवेशासाठी नेमकी नियमावली काय?
उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 5:32 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (13 ऑक्टोबर) मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कॉलेज सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील शाळा येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याती महत्त्वाची घोषणा केली. यावेळी उदय सामंत यांनी कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच कॉलेज, विद्यापीठांसाठी असलेल्या नियमावलींची माहिती देखील दिली.

कॉलेज प्रवेशासाठी विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी नेमकी नियमावली काय?

“विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन तिथल्या प्राधिकारणाशी चर्चा करुन म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मोठ्या पद्धतीने लसीकरणाचे काम विद्यापीठात किंवा विद्यापीठाच्या प्रांगणात करावे. ज्या क्षेत्रात कोरोना असू शकतो, कोरोना कमी झालाय किंवा कोरोना वाढू शकतो त्या क्षेत्रातले आयुक्त, महापालिका किंवा जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या कोविड 19 आजाराचा स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून विद्यापीठ आणि प्राधिकरणाने पुढचे निर्णय घ्यावे, असं आम्ही जीआरमध्ये म्हटलं आहे”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

‘स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा’

“तिसरी लाट येणार आहे की नाही ते अद्याप कुणालाच माहिती नाही. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची नियमावली तयार करण्याची वेळ आली तर विद्यापीठाने त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे स्पष्ट मत आम्ही शासन म्हणून घेतलेला आहे. कारण काही अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. तसेच काही ठिकाणी प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे हीच नियमावली लागू करायची की नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी नियमावली असू शकते”, असं सामंत म्हणाले.

‘त्या विद्यार्थ्यांसाठी कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था करावी’

“ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कॉलेजमध्ये उपस्थित राहणं शक्य होणार नाही त्यांची कम्पलसरी ऑनलाईन व्यवस्था महाविद्यालय किंवा विद्यापीठांनी करुन द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कोविड 19 ची लस घेतली नाही त्यांच्याकरता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून विशेष लसीकरण मोहिम राबवावी, अशा सूचना आम्ही जीआरमध्ये नमूद केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

‘वसतीगृह देखील टप्प्याटप्प्याने सुरु होणार’

“वसतीगृहांच्या संदर्भात देखील मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. टप्प्याटप्प्याने वसतीगृह उघडण्याबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण ही सुरु करत असताना मुंबई उच्च शिक्षण संचालक आणि पुण्याचे उच्च शिक्षण संचालकांनी यांनी पूर्ण वसतीगृहांचा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतरच वसतीगृह सुरु करायचे आहेत”, अशी सूचना उदय सामंत यांनी केली. तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आऊटसोअर केलेला स्टाफ जो विद्यालयात काम करतो त्यांचं शंभर टक्के लसीकरण करुन घेण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे, अशीही सूचना त्यांनी केली.

हेही वाचा : राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु, विद्यार्थ्यांना दोन्ही डोस आवश्यक

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.