Maharashtra Rain Weather Update : मुंबईत जोरदार, विदर्भासह नाशिक-पालघरला ऑरेंज अलर्ट, राज्यभरात सर्वदूर पावसाची शक्यता

शनिवारी दिवसभर आणि रात्री मुंबईत जोरदार पाऊस बरसला. येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Weather Update : मुंबईत जोरदार, विदर्भासह नाशिक-पालघरला ऑरेंज अलर्ट, राज्यभरात सर्वदूर पावसाची शक्यता
Rain Update

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसतोय. काल (शनिवारी) दिवसभर आणि रात्री मुंबईत जोरदार पाऊस बरसला. येत्या 24 तासांत मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच मुंबईत काळ्या ढगांनी दाटी केली आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  (Maharashtra Mumbai Rain Update by Imd heavy Raifall next 24 hour)

महाराष्ट्रातही सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व विभागात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत पावसाची बॅटिंग

काही दिवसांच्या विश्रांती नंतर मुंबईमध्ये एकदा परत रिमझिम पावसाची सुरुवात झाला असून अनेक ठिकाणी बोरिवली, गोरेगाव मालाड, दादर सायन कुर्ला आणि मुंबई सेंट्रल परिसरातील रिमझिम पाऊस सुरु आहे. सकाळी 4 ते 7 च्या दरम्यान मुंबईत जोरदार पाऊस झाला. अनेक सखल भागांत यामुळे पाणी साचलेलं पाहायला मिळालं.

मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरण, कुठे किती पाऊस?

हे ही वाचा :

Weather Alert today : मुंबईत जोरदार तर अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार, कुठे कुठे पाऊस पडणार?

Weather Alert: राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, नेमका पाऊस कुठं पडणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI