रात्र धुंदीत ही जागवा… पण जपून… पेदाडांवर सीसीटीव्हीची नजर, पानटपऱ्या आणि… थर्टीफर्स्ट निमित्त कुठे काय तयारी?
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठी तयारी सुरू आहे. मुंबई, पुणे, कोकण, साताऱ्यासह इतर शहरांमध्ये पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरक्षेचा कडक बंदोबस्त केला असून, ड्रंक ड्रायव्हिंग आणि इतर कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांना सुरक्षित आणि आनंददायी नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन केले जात आहे.

थर्टीफर्स्टचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. अवघ्या काही तासात जुनं वर्ष सरणार आहे आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्ताने पर्यटनस्थळी अलोट गर्दी झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बूक झाले आहेत. एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये राहण्यासाठी पर्यटक पाहिजे ती रक्कम मोजायला तयार आहे. तर हॉटेल मालकही अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत आहे. रात्र धुंदीत जागवण्यासाठी तर तळीरामांचीही वेगळीच लगबग सुरू झाली आहे. मात्र, या सर्वांना चाप लावण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहेत. पेदाडांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे. ...
