लोकांमध्ये दिसून आला राग, हिंदू- मुस्लीम लग्नानंतरचा स्वागत समारंभ रद्द

एका संपादकाचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लिम संघटनांकडून सभागृहाच्या मालाकाला फोन करण्यात आले की, परिसरात शांतता राखण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करा.

लोकांमध्ये दिसून आला राग, हिंदू- मुस्लीम लग्नानंतरचा स्वागत समारंभ रद्द
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 12:21 AM

मुंबईः श्रद्धा हत्याकांड झाल्यानंतर महाराष्ट्रातील वसईमध्ये स्थानिक संघटनांच्या विरोधानंतर एका नवविवाहित हिंदू-मुस्लिम दांपत्याच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टी रद्द केली गेली आहे. शनिवारी पोलिसांनी ही माहिती दिली. दिल्लीतील महरौली हत्याकांडमधील पीडित श्रद्धा वालकर ही पालघर जिल्ह्यातील वसई शहरात राहणारी होती. एका वृत्तवाहिनीच्या संपादकान शुक्रवारी सकाळी रिसेप्शनच्या आमंत्रपत्रिकेचा एक फोटो लव्हजिहाद आणि दहशतवादी असा हॅशटॅग कृत्य करुन पोस्ट करण्यात आला होता.

आणि या कार्यक्रमाचा संबंध श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाशी जोडला गेला होता. त्यानंतर एका पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका हिंदू-मुस्लिम नवविवाहित दांपत्याचा रिसेप्श रविवारी सायंकाळी एका सभागृहात आयोजित केला गेला होता. मात्र या रिसेप्शनला विरोध झाल्यानंतर हा कार्यक्रम रद्द केला गेल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, एका संपादकाचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर स्थानिक हिंदू आणि मुस्लिम संघटनांकडून सभागृहाच्या मालाकाला फोन करण्यात आले की, परिसरात शांतता राखण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करा.

त्यानंतर नवदांपत्याच्या दोन्ही कुटुंबातील लोकांनी माणिकपूर पोलीस स्थानकात येऊन रिसेप्शनचा कार्यक्रम रद्द केला असल्याचे त्यांनी सांगितले.

या नवदांपत्याविषयी माहिती पोलिसांनी माहिती सांगताना ते म्हणाले की, जी एक हिंदू महिला आहे, आणि तिचा पती हा मुस्लिम आहे, आणि ही दोघं एकमेकांना गेल्या अकरा वर्षापासून ओळखतात.

त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांकडून या विवाहाला विरोध न करता त्यांचे समर्थन केले आहे. आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी न्यायालयात जाऊन आंतरधर्मीय विवाह केला आहे.

आफताब अमीन पूनावालाने आपल्या लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरला 18 मे रोजी तिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते.

मात्र त्याने आपण तिचे 18 तुकडे केल्याचे कबूल केले होते. त्यानंतर श्रद्धाची हत्या करणारा आरोपी हा दक्षिण दिल्लीतील महरौलीमधील आपल्या घरातली फ्रिजमध्ये तिच्या शरीराचे तुकडे तीन आठवडे ठेवले होते.

त्यानंतर काही दिवस ते तुकडे तो वेगवेगळ्या भागात फेकत होता. त्यामुळे आता दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपी आफताबने कुठे कुठे तिच्या मृतदेहाचे तुकडे टाकले होते, त्याचा शोध घेत आहेत.

या प्रकरणात श्रद्धाच्या जुन्या प्रमुखांचीही चौकशी केली होती, कारण त्यातून तर या प्रकरणाचा छडा लागेल असं पोलिसांना वाटत होते.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.