Rajya Sabha Election: सपाचा बैठकीवर बहिष्कार, एमआयएमचा निर्णय गुलदस्त्यात, फोनाफोनी, बैठकांवर जोर; आजचा दिवस निर्णायक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या 8 जून रोजी औरंगाबादला सभा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या औरंगाबादमध्ये असतील. 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे.

Rajya Sabha Election:  सपाचा बैठकीवर बहिष्कार, एमआयएमचा निर्णय गुलदस्त्यात, फोनाफोनी, बैठकांवर जोर; आजचा दिवस निर्णायक
सपाचा बैठकीवर बहिष्कार, एमआयएमचा निर्णय गुलदस्त्यातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 10:37 AM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election) अवघे तीन दिवस बाकी आहेत. त्यामुळे आमदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी अपक्ष आमदारांना फोन करून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयातून आज सर्व आमदारांना फोन गेले असून महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) उमदेवाराला मतदान करण्याची विनंती करण्यात आली आहे. आज महाविकास आघाडीची बैठक होत आहे. तिन्ही पक्षाचे नेते या बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या बैठकीलाही येण्याची विनंती करण्यात आली आहे. अनेक छोट्या राजकीय पक्षांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडलं आहे. त्यामुळे आघाडीने आज बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला कोणत्या कोणत्या पक्षाचे नेते येतात हे पाहिलं जाणार आहे. त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे आघाडीसाठी आजचा दिवस निर्णायक असल्याचं सांगितलं जात आहे.

आजचा दिवसच निर्णायक का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या 8 जून रोजी औरंगाबादला सभा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या औरंगाबादमध्ये असतील. 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसात सर्व अपक्ष आमदार आणि पक्षांच्या आमदारांना विश्वासात घेण्यात येणार आहे. त्यांना विश्वास दिला जाणार आहे. त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची आहे. पुढील दोन दिवस धावपळीचेच असणार असल्याने आज दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात संबोधित करणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

सपाचा बैठकीवर बहिष्कार

हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांचं मन वळवण्याचं आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केला. पण त्यात आघाडीला यश आलं नाही. त्यानंतर आता समाजवादी पार्टीने आजच्या आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीची दोन मते आघाडीला मिळणार नसल्याचं दिसत असून सपाच्या या भूमिकेमुळे आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. तर एमआयएमच्या नेत्यांना काल महाविकास आघाडीचे नेते भेटले. पण एमआयएमने अजूनपर्यंत आपले पत्ते खोलले नाहीत. ओवैसी आज महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ते आज याबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात, असं सांगितलं जातं.

माझी तुमच्यावर नजर

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या सर्व आमदारांशी संवाद साधल्याचं कळतंय. माझी तुमच्यावर नजर आहे. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, असं मुख्यमंत्र्यांनी या आमदारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.