AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING : ‘वर्षा’वर हालचाली वाढल्या, मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यासह पोलीस महासंचालक यांच्यात खलबतं, काहीतरी मोठं घडतंय?

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळ्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटेनमुळे जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. या घटनेवरुन विरोधक प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.

BIG BREAKING : 'वर्षा'वर हालचाली वाढल्या, मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यासह पोलीस महासंचालक यांच्यात खलबतं, काहीतरी मोठं घडतंय?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 28, 2024 | 11:45 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथील राजकोट किल्ला प्रांगणात कोसळला. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक आज रात्री 10:30 वाजता वर्षा बंगल्यावर सुरु आहे.  राज्याचे मुख्य सचिव आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा उपस्थित आहेत. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची मुख्य कारणं कोणती होती? तसेच मालवण मधील कायदा सूव्यवस्था संदर्भातही चर्चा सुरु आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळ्यामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटेनमुळे जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. या घटनेवरुन विरोधक प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे राजकोट किल्ल्यावर आज कल्पनेच्या पलिकडील घडामोडी घडल्या.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, शरद पवार गटाचे जयंत पाटील, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. त्यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्तेदेखील तिथे उपस्थित होते. यावेळी भाजप नेते नारायण राणे मुलगा निलेश राणे यांच्यासह तिथे उपस्थित होते. त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात राडा झाला. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे सत्ताधारी पक्षांवर मोठी टीका केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपचं दिल्लीतलं हायकमांडकही राज्य सरकारवर या घटनेवरुन नाराज आहे. संबंधित घटनेनंतर राज्यातील मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीतले भाजपचे केंद्रीय मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. असं असताना राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या घटनेचा महायुतीला फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे महायुती सरकार सतर्क झालं आहे. संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही वाद उद्भवू नये तसेच विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळू नये यासाठी सरकारकडून रणनीती आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाण्याची चिन्हं आहेत

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात