महायुतीच्या नेत्यांनी शड्डू ठोकला, विधानसभेसाठी प्लॅन आखला, ‘सागर’ बंगल्यावर हालचाली वाढल्या

महायुतीच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्लॅन आखला आहे. महायुतीचे नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रचाराबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महायुतीच्या नेत्यांनी शड्डू ठोकला, विधानसभेसाठी प्लॅन आखला, 'सागर' बंगल्यावर हालचाली वाढल्या
महायुती
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 9:00 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कारण आगामी निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांसाठी फार महत्त्वाची असणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला महायुतीमधील आमदार प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, सचिन जोशी, उदय सामंत, योगेश टिळेकर, अजित गोपछडे, संजय खोडके हे नेते उपस्थित होते.

महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. “आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत तीनही पक्षाचे सदस्य उपस्थित होते. उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. विधानसभा निवडणुकीतील दौऱ्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा होईल आणि या सभा होत असताना महायुती सक्षमपणे लढेल”, असं प्रसाद लाड म्हणाले.

फडणवीसांनी आमदारांची बोलावली बैठक

दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर मुंबई महानगरातील आमदारांची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबई महानगरातील आमदारांसोबत आज चर्चा करणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर मतदारसंघातील आमदारांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत.

या बैठकीसाठी आमदार गणेश नाईक, श्रीकांत भारती, महेश चौगुले, कालिदास कोलंबकर, विद्या ठाकूर, संजय केळकर, कुमार आयलानी, मनीषा चौधरी, पराग अलवाणी, प्रवीण दरेकर, भारती लव्हेकर, अमित साटम, प्रसाद लाड, मंगल प्रभात लोढा, अतुल भातखलकर, योगेश सागर, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे हे आमदार ‘सागर’वर दाखल झाले आहेत.

उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची उद्या सयुंक्तपणे वर्षा या निवासस्थानी रात्री 08:00 वाजता बैठक होणार आहे. आजच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्राचारयंत्रणा, सभा, दौरे या संदर्भात चर्चा झाली.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.