AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द

मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द
Vishakha RautImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 21, 2026 | 7:54 PM
Share

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी: मुंबई महापालिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने हा निर्णय घेतला आहे. आता विशाखा राऊत कोर्टात अपील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा राऊत या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने घेतला आहे. हा उद्धव ठाककेंना मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, या निर्णयाचा विषय अद्याप महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. त्यामुळे राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. हा विषय सभागृहात मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विशाखा राऊत यांचा शिंदे सेनेवर आरोप

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर बोलताना विशाखा राऊत यांनी म्हटले की, ‘माझ्यावर दबाव नव्हता, त्या समितीवर दबाव होता. माझे पेपर व्यवस्थित आहेत, माझे आजोबा पालघरचे होते, म्हणून तिकडून मी सर्टिफिटेक काढले. त्यांच्यावर वेगळा दबाव होता, दबावातून हे सर्व झाले. मी 1911 आणि 1937 चा पुरावा दिला, मोडी लिपीचा पुरावा दिला. आजोबा पणजोबाचे पुरावे दिले असताना सर्टिफिटेक रद्द केले. भाजपकडून दबाव नाही, शिंदेसेनेकडून दबाव आहे. मी कायदेशीर लढाई लढणार. सदा सरवणकर एक महिना आगोदर सांगून गेले, माझी मुलगी नगरसेवक होणार म्हणून. त्यांना स्वप्न पडले होते का? शिंदे यांनी स्क्रूटीनी समितीवर दबाव टाकला तसा दबाव मुंबई महापालिका मध्ये टाकतील असा आरोप राऊत यांनी केला आहे.

बुशरा नदीम मलिक यांचेही नगरसेवक पद रद्द

याआधी राष्ट्रवादीलाही मोठी धक्का बसला होता. मुंबई महापालिकेत प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे. बुशरा यांचेही नगरसेवक पद जात पडताळणी समितीने रद्द केले होते. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पद रद्द झाल्याने ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला आहे.

रोशन शेख यांचेही पद रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या AIMIMच्या नगरसेविका रोशन शेख यांची सदस्यता रद्द केली होती. जात पडताळणी समितीने त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. महापालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 27 एप्रिल 2026 रोजी रोशन शेख यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवले. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले होते.

Follow Us
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सितरमण यांना आर्ध्यात
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सितरमण यांना आर्ध्यातच सोडाव लागलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...