AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांनी वाशीमध्ये मोर्चा रोखला, पण सरकारला दिला मोठा इशारा, आता माघार नाहीच

मराठ्यांचा लाखोंचा मोर्चा आज वाशीमध्ये पोहोचला आहे. एवढा अवाढव्य मोर्चा घेऊन मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानावर येऊ नये, यासाठी सरकारकडून प्रचंड प्रयत्न करण्यात आले. सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना सरकारचा नवा जीआर दाखवला. हा जीआर मनोज जरांगे यांनी लाखो आंदोलकांपुढे वाचून दाखवत आपल्या आंदोलनाची पुढची दिशा सांगितली.

मनोज जरांगे यांनी वाशीमध्ये मोर्चा रोखला, पण सरकारला दिला मोठा इशारा, आता माघार नाहीच
| Updated on: Jan 26, 2024 | 4:11 PM
Share

नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी एक दिवसाचा वेळ दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दिला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सगेसोयरेच्या मुद्द्यावरुन सरकारला आज एक दिवसाचा वेळ दिला. सरकारने आज रात्रीपर्यंच सगेसोयरीच्या मागणीचा जीआर तयार करावा, आम्हाला आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत जीआर तयार करुन द्या. अन्यथा उद्या आमचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघेल, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. विशेष म्हणजे आरक्षण मिळालं किंवा नाही मिळालं तरी आझाद मैदानावर जाणार, असं मनोज जरांगे ठामपणे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी यावेळी सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगेचा मेसेज वाचला. “सग्यासोयऱ्यांच्या व्याख्येसह आपण अध्यादेश काढणार आहोत. त्यावर सर्व सचिवांनी सह्या केल्या. असं सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सही केलीय. मग एवढं झालंय तर मग अध्यादेश का काढला नाही. काही करा. रात्रीतून अध्यादेश काढा. हवं तर आजची रात्री इथेच काढतो. आम्ही २६ जानेवारीचा सन्मान करतो. आम्ही मुंबईत जात नाही. इथेच थांबतो. प्रशासनाचा सन्मान करतो. तुम्ही एवढं केलंय तर अध्यादेश द्या. जे जे निर्णय घेतले. आदेश काढले तेवढे द्या. मी वकिलांशी चर्चा करून शब्दा शब्दावर किस पाडतो. अभ्यास करतो रात्रभर. तुम्ही आज रात्री नाही दिलं तर उद्या आझाद मैदानात जाणार आहोत. आम्ही एक पाऊल मागे येऊ, पण उपोषण सोडणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे सरकारला उद्देशून मोठा इशारा

“न्यायासाठी आपण इथे आलो आहोत. आपले पोरं या शहरात उभे आहेत. लेकराबाळाला पाणी लागलं तर पाणी द्या. त्यांना साथ द्या. गोरगरीबांच्या मराठ्यांना डिवचलं तर महाराष्ट्रातील मराठासमाज मुंबईत येईल हे लक्षात घ्या. आपण आडमुठेपणा करायला आलो नाही. न्यायासाठी आलोय. आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मराठ्यांनी घरात थांबू नका. झाडूनपुसून मुंबईत या. कोरोडोने या. जे निर्णय घेतले त्याचे पत्रक काढा. डेटाही द्या. सग्यासोयऱ्यांचा अध्यादेश काढा. उद्या दुपारी ११ ते १२ वाजेपर्यंत आम्हाला अध्यादेश द्या. नाहीतर आझाद मैदानात येणार आहोत. आम्ही इथून उठणार नाही. मला डेटा पाहिजे. अध्यादेश हवा. केसेसचं पत्र हवं, मोफत शिक्षण आणि नोकरीत राखीव जागा ठेवण्याचा निर्णय पाहिजे”, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

‘आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही’

“अध्यादेश आला म्हणजे तो वाचूनच निर्णय घेणार. त्याआधी निर्णय घेणार नाही. आझाद मैदानाचा निर्णय उद्या सर्वांनी बसून घ्यायचा आहे. तुमच्याशिवाय निर्णय घ्यायच नाही. पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. “कुणीही आता आझाद मैदानावर जाऊ नका. आज इथेच थांबा. आराम करा. मी वकिलांशी चर्चा करतो”, असंदेखील मनोज जरांगे म्हणाले.

“सग्यासोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातील एकही मराठा वंचित राहू शकत नाही. राहिला तर तुम्ही माझ्याकडे या. पुन्हा ताकदीनं आंदोलन उभं करेन. पण एकही मराठा वंचित ठेवणार नाही. या ५४ लाख नोंदीचा डेटा हवा. सग्यासोऱ्याचा आदेशच काढला नाही. चिवटेंना विनंती आहे. तुम्ही प्रयत्न केला. आम्ही त्यासाठीच इथे आलो. आम्हाला हौस नाही. आम्ही कष्टकरी लोक आहोत. आमची इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्रीच हा अध्यादेश द्यावा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.