निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय (Mantralaya will closed for sanitisation) इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

निर्जंतुकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस  बंद

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय (Mantralaya will closed for sanitisation) इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. मंत्रालयातील निर्जंतुकीकरणाचं हे काम पुढील दोन दिवस म्हणजेच 29 आणि 30 एप्रिलदरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस मंत्रालय बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे (Mantralaya will closed for sanitisation).

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. सर्व खाजगी कंपन्या, दुकानं बंद आहेत. मात्र, प्रशासनाचं काम सुरु आहे. राज्यातील सर्व महापालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम अवितरत सुरु आहे. मंत्रालयाचंदेखील कामकाज सुरु आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. हे निर्जंतुकीकरण 29 आणि 30 एप्रिल या दोन दिवसांमध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे मंत्रालय पुढील दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांमध्ये निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्याची सूचना केंद्र सरकारच्या गाईडलाईन्समध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नविन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (28 एप्रिल) मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या प्रमुख शहरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. त्यासोबत वसई-विरार, पालघर, कल्याण डोंबिवली या ठिकाणीही नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे.

मुंबईला कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मुंबईतील झोपडपट्टी  परिसरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आज मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात 8 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. विक्रोळी परिसरातील वीटी बेकरी परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. यामुळे 60 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. आजच्या दिवसात आणखी दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या दहा जणांपैकी 9 रुग्ण एकट्या रुपीनगर भागातील आहेत. यामध्ये रुपीनगर भागातील सहा पुरुष आणि तीन महिला अशा नऊ रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण? 

पिंपरी चिंचवडमध्ये शंभरीपार कोरोनाग्रस्त, रुपीनगरमध्ये 9 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

मालेगावात आणखी 36 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, 9 वर्षाच्या मुलाचाही समावेश

नागपूरचे हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरात 450 जण क्वारंटाईन, कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

Published On - 4:49 pm, Tue, 28 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI