रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या खास सुविधा

रेल्वेच्या 'नवीन, इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम' (NINFRIS) चा फायदा घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या हितासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी अनेक चांगल्या कल्पना आणल्या आहेत.

रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या खास सुविधा
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 8:47 PM

मुंबई : मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल प्रवास देण्यासाठी सातत्याने काम नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. रेल्वेच्या ‘नवीन, इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम’ (NINFRIS) चा फायदा घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या हितासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी अनेक चांगल्या कल्पना आणल्या आहेत. गेल्या एक वर्षात सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनव कल्पनांपैकी, स्वयंचलित तिकीट तपासणी आणि व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली ( ATMA system), एझिस्पीट स्पिटून, वेंडिंग कियॉक्स आणि बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा यांचा समावेश आहे.(Many facilities of Central Railway for passenger service)

बॅगेज रॅपिंग आणि सेनिटेशन सुविधा

कोविड-१९ या सर्व देशभर पसरलेला साथीच्या आजाराच्या भीतीपासून मुक्तता होण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, नागपूर आणि पुणे स्टेशन येथे अतिनील किरणांद्वारे पॅसेंजरच्या सामान, पार्सलसाठी बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा सुरू केली आहे.

स्वयंचलित वेंडिंग कियॉस्क

मुंबई, नागपूर आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर स्थापित स्वयंचलित वेंडिंग कियॉस्कने मास्क, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझरच्या बाटल्या अशा संरक्षणात्मक साधनांची सोय करुन प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

टीएमए सिस्टम

नागपूर स्थानकात स्थापित स्वयंचलित तिकीट तपासणी व व्यवस्थापकीय प्रवेश प्रणाली कोविड-१९ रोखण्यासाठी प्रवाशाची तिकीट स्थिती शोधण्यासाठी बोर्डिंग प्रोटोकॉल स्वयंचलित अंमलबजावणीद्वारे प्रतिबंधित करते आणि केवळ लक्षणे नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यास परवानगी देते.

एझीस्पीट स्पिटून

नागपूर रेल्वे स्थानकात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून होणारी अडचण टाळण्यासाठी इझीस्पिट स्पिटून अभिनव कंटेनर वेंडिंग मशीन हा एक अभिनव उपाय केला आहे. स्पिट कंटेनर, स्पिट पाउच आणि व्होमिट किट या उत्पादनांच्या विक्रीसाठी नागपूर रेल्वे स्थानकात दोन स्वयंचलित वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या. ही उत्पादने आरोग्यदायी आणि स्वच्छ रेल्वे परिसराची खात्री करतात, कोविड संसर्गाचा प्रसार रोखतात आणि बऱ्याच पैशाची बचत करतात, रेल्वेच्या आवारात थुंकलेल्या डागांच्या साफसफाईवरील खर्च, या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे प्रवाशांना केवळ चांगल्या सुविधा आणि सेवाच मिळाल्या नाहीत तर रेल्वेला नॉन-फेअर रेव्हेन्यूही मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

लोकल सेवा सुरु करण्यावरुन मनसे-शिवसेना आमने-सामने, प्रवाशांच्या सुरक्षेवरुन खडाजंगी

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

Many facilities of Central Railway for passenger service

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.