AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ दिमाखात साजरा

Marathi Bhasha Gaurav Diwas : मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. दहिसरच्या विद्यामंदिर शाळेतही असाच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी उपस्थिती लावली होती.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत 'मराठी भाषा गौरव दिन' दिमाखात साजरा
दहिसरच्या विद्यामंदीर शाळेत 'मराठी राजभाषा दिन' दिमाखात साजराImage Credit source: TV9 Network
| Updated on: Feb 27, 2026 | 3:58 PM
Share

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. या दिवसाचं औचित्य साधून  दहिसरच्या ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या ‘विद्या मंदिर’ शाळेत शुक्रवारी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सर्व विभागांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सभागृहात उपस्थित होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी विद्या मंदिर शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या ‘मराठी राजभाषा दिना’चे औचित्य साधत शब्दशिल्प (खंड तीन) या मराठी हस्तलिखिताचे अनावरण अभिनेत्री बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी कविता, नाटिका आदी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.

अभिनेत्री ऋतुजा बागवे या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की, पुस्तकांशी मैत्री करा. वाचनाने आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व विकास घडतो. पु. ल. देशपांडे, द .मा. मिरासदार यांच्या पुस्तकाने वाचनाची गोडी निर्माण होते. तसेच नाटक सिनेमा मराठी साहित्य यांचा आस्वाद घ्या. त्याने आयुष्याला दिशा मिळते, याचे उदाहरण आपण स्वतः आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...