ही तर ‘जन छळवणूक यात्रा’; महापौर किशोरी पेडणेकर यांनी उडवली जन आशीर्वाद रॅलीची खिल्ली

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रॅलीची खिल्ली उडवली आहे. (mayor kishori pednekar Mocks bjp's jan ashirwad rally)

ही तर 'जन छळवणूक यात्रा'; महापौर किशोरी पेडणेकर यांनी उडवली जन आशीर्वाद रॅलीची खिल्ली
mayor kishori pednekar

मुंबई: भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या रॅलीची खिल्ली उडवली आहे. ही जन आशीर्वाद रॅली नाही तर जन छळवणूक रॅली आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या रॅलीची खिल्ली उडवली आहे. (mayor kishori pednekar Mocks bjp’s jan ashirwad rally)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही खोचक टीका केली आहे. कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, अशी खोचक टीका महापौर पेडणेकर यांनी केली आहे.

विरोधकांचं मीठ आळणी

एका वृत्तसंस्थेने देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर महापौरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केलं म्हणून ते नंबर पाचमध्ये आले. विरोधकांचं मीठ आळणीच राहिलं आहे, अशी टीका त्यांनी केली. मातोश्रीने करून दाखवलं. त्यामुळे मातोश्री टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसंही आम्हाला कुणी टार्गेट केलं तरी काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिल्लीतून व्हॅक्सिन आणा

महाराष्ट्रातील मंदिरे उघडी करण्यात आलेली नाही. राज्याबाहेरची मंदिरे उघडी आहेत. तिथे काळजी घेतली जातेय. पण मंदिरे उघडण्यापेक्षा विरोधकांनी दिल्लीतून व्हॅक्सिन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटाही त्यांनी काढला. मनपाच्या रुग्णालयात राज्याला केंद्राकडून आलेले डोस दिले जातात. सुराना, रिलायन्सने फुकट लस दिली. मनपाच्या प्रयत्नांना तितकं यश नाही. पण टोकाचे प्रयत्न आम्ही करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. पर्यावरण मंत्र्यांमुळे गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुराना सेठिया रुग्णालयाचं नाव आलं आहे. कमी दिवसांत जास्त व्हॅक्सिनेशन केल्याने ते शक्य झालं आहे, असंही त्या म्हणाल्या. तसेच कोटक इंश्युरन्सने सीएसआरच्यामाध्यमातून दोन वेंटिलेटर दिले आहेत. ही काळाची गरज आहे. शिवसेनेला सामाजिक जबाबदारी सांगण्याची गरज नाही. समाजाचं आपण देणं लागतो. या भावनेतून आम्ही काम करतच असतो, असं त्या म्हणाल्या. (mayor kishori pednekar Mocks bjp’s jan ashirwad rally)

 

संबंधित बातम्या:

शिवसेनेच्या रॅलींमधून कोरोना पसरत नाही का?; कपिल पाटलांचा राऊतांवर पलटवार

जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांची भाजपवर टीका

महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले

(mayor kishori pednekar Mocks bjp’s jan ashirwad rally)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI