महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही. (Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 1:20 PM

मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने  महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी राज्यातून शिवसेनेला कोणी संपवू शकणार नाही, अशा शब्दात उदय सामंत यांनी भाजपला ललकारले आहे. (Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना भाजपवर थेट हल्लाबोल केला. केंद्र सरकारने महाराष्ट्रातून 40 नेत्यांना मंत्रिपद दिलं तरी ते शिवसेनेला संपवू शकत नाहीत. जन आशीर्वाद यात्रेचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. जन आशीर्वाद रॅली ही कशी सुरू झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने बीडमध्ये पाहिलचं आहे, असा चिमटा सामंत यांनी काढला.

प्रशासन आपलं काम करेल

कोरोना संपलेला नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे सर्वांनीच कोव्हिडंचे नियम पाळले पाहिजेत. खुद्द पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका आहे. तीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. जर त्यामध्ये कोणी अतिरेक करत असेल तर प्रशासन त्यांचं काम करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

देशाचं नेतृत्व करण्यासाठीचा कौल

एका वृत्तवाहिनीने देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॉप फाईव्हमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यावर सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. विरोधकांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि सध्या ते ज्या पद्धतीने राज्याचं नेतृत्व करत आहेत, त्यावरून त्यांनी देशाचंही नेतृत्व करावं, असाच कौल या सर्व्हेतून आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

तिसऱ्या लाटेला निमंत्रण

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात… ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं. (Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

संबंधित बातम्या:

जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांची भाजपवर टीका

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी : काँग्रेस

भोळ्या भाबड्या महादेवाला तांबे-पितळाचा 5 क्विंटलचा साज, डोळ्यात भरणारं ‘सुवर्ण रुप!’

(Uday Samant slams bjp over jan ashirwad yatra)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.