कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी : काँग्रेस

कोरोना काळात एका एका कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले. आर्थिक कमजोर झाले. यामुळे पंतप्रधांनी देशाची जाहीर मागावी ,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, मोदींनी माफी मागावी : काँग्रेस
nana patole
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 9:43 AM

बुलडाणा : कोरोनामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांची जाहीर माफी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागावी. लसी दुसऱ्या देशांना पाठवून भाजपने कोरोना काळात हत्याकांड घडविले, त्यांनी हे पाप केलं, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

कोरोना काळात एका एका कुटुंबातील अनेक लोकांचे जीव गेले. आर्थिक कमजोर झाले. यामुळे पंतप्रधांनी देशाची जाहीर मागावी ,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तर हे जे कृत्य झाले ते म्हणजे जालियनवाला हत्याकांड प्रमाणे झाले आहे. यासाठी  केंद्राची चुकी झाली आहे. भाजपने हे हत्याकांड घडविले असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

लसीकरण करण्यासाठी जी मदत करायला पाहिजे होती, ती केली नाही. यांनी पाकिस्तानात लसी पाठवल्या, त्यामुळे हे हत्याकांड घडवण्याचं पाप केंद्राने केले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

अफगाणिस्तानात धर्माच्या राजकारणाने परिस्थिती चिघळली

सध्या अफगाणिस्तानमध्ये जी काही परिस्थिती उद्भवली आहे, धर्माच्या आधारावर जे काही राजकारण होतेय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी धर्माच्या आधारावर राजकारण चालते आहे. त्याचाच हा परिणाम आहे. हिंदुस्तानमध्ये असे होत नाही, मात्र इथे सुद्धा 75 वर्षानंतर आता धर्माच्या नावावर राजकारण करण्याचे काम काही लोक करतायेत. मात्र धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांचा चेहरा आता समोर आला आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

भारतात असलेल्या अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून नक्कीच मदत केली जाणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

जन आशीर्वाद यात्रेवर टीकास्त्र 

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?, अशा शब्दात नाना पटोले यांनी या जन आशीर्वाद यात्रेची फिरकी घेतली आहे. तसेच जनता भाजपला घरी पाठवण्याचाच आशीर्वाद देईल, असा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

देशाचा सत्यानाश केला

दुसऱ्याच्या घरात झाकून बघण्याचे काम काँग्रेसचे नसून ते भाजपचे काम आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांचीच प्रायव्हेसी संपवून हेरगिरीचे काम केल्याचा आरोप करत अशा विक्षिप्त मानसिकतेच्या लोकांनी देशाच्या राजकारणात येऊन देशाचा सत्यानाश केल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली गेली, परंतु मागील 7 वर्षापासून ही सर्व व्यवस्थाच मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षासाठी संविधान व देशाची एकात्मता सर्वोच्च असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

संबंधित बातम्या 

पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंनी घेतली फिरकी

देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा! : नाना पटोले

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.