महिनाभरात मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्री

| Updated on: May 15, 2020 | 7:46 PM

पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy) सांगितलं.

महिनाभरात मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार, कोणतीही परीक्षा नाही : आरोग्य मंत्री
Follow us on

मुंबई : “राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.” (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy)

मुंबईतील एमएमआरडीए मैदानात अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही उपस्थितीत  होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आरोग्य मंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणाले?

राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने तातडीने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली आहे.

माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. या सर्व जागा आम्ही महिनाभरात शंभर टक्के जागा भरणार आहोत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy) म्हणाले.

किती जागा रिक्त?

  • सार्वजनिक आरोग्य विभाग – 17 हजार 337
  • वैद्यकीय शिक्षण विभाग – 11 हजार
  • राज्यभरातील मनपा रुग्णालयांत हजारो जागा रिक्त

लॉकडाऊनच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा मजबूत करणं आणि मनुष्यबळाची शंभर टक्के व्यवस्था करणे हे आमचं ध्येय आहे. कारण लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मेडिकल वर्कर्स काम करत आहेत. ते थकल्यानंतर नवीन टीम असली पाहिजे. तसंच अशा परिस्थितीत काही रिक्त जागा असू नयेत, याची खबरदारी घेऊन आम्ही या गोष्टी अत्यंत तत्परतेने करण्याचा निर्णय घेतला आहे, असं राजेश टोपे म्हणाले. (Health minister Rajesh Tope On Medical Vacancy)

पाहा व्हिडीओ : 

संबंधित बातम्या : 

Lockdown 4 | रणनीती ठरवण्यासाठी शरद पवारही मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, रिक्त पदांबाबतही चर्चा

रायगड पोलीस अधीक्षकांची अनोखी आयडिया, प्रवास परवान्यासाठी तयार केलेल्या पोर्टलचा राज्यातील पोलीस दलाला फायदा